Bat Ball Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Women's T20 Cricket: गोव्याच्या पोरी पुन्हा हारल्या! ओडिशानं 10 विकेट्सने नोंदवला दणदणीत विजय; माधुरी-सरीता जोडी चमकली

Odisha Defeated Goa: सीनियर महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेत सलग तीन सामने जिंकून अपेक्षा उंचावलेल्या गोव्याच्या संघाला गुरुवारी सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.

Manish Jadhav

पणजी: सीनियर महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेत सलग तीन सामने जिंकून अपेक्षा उंचावलेल्या गोव्याच्या संघाला गुरुवारी सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. ओडिशाने त्यांच्यावर 10 विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. सामना बडोदा येथील कोटांबी स्टेडियमवर झाला. जम्मू-काश्मीर, मिझोराम, मुंबई या संघांना नमवल्यानंतर गोव्याच्या महिला संघाला मागील लढतीत आंध्रकडून पराभव पत्करावा लागला होता.

ठराविक अंतराने विकेट्स पडल्या

दरम्यान, गोव्याने 11 धावांचे आव्हान दिल्यानंतर ओडिशाच्या सरिता मेहेर (59) व कर्णधार माधुरी मेहेता (49) या सलामीच्या जोडीने 16.3 षटकांतच विजयाला गवसणी घातली. त्यापूर्वी, गोव्याची कर्णधार संजुला नाईक (24) व पूर्वजा वेर्लेकर (22) यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या 45 धावांच्या भागीदारीनंतर ठराविक अंतराने विकेट गमावल्यामुळे मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तरन्नुम पठाण हिच्या नाबाद 37 धावांमुळे गोव्याला शतकी धावसंख्या उभारता आली, परंतु इतरांची साथ लाभली नाही.

धावफलक

गोवा संघ: 20 षटकांत 7 बाद 110 (संजुला नाईक 24, श्रेया परब 0, पूर्वजा वेर्लेकर 22, तरन्नुम पठाण नाबाद 37, प्रीती यादव 6, तेजस्विनी दुर्गड 1, तनया नाईक 6, पूर्वा भाईडकर 5, विनवी गुरव नाबाद 4, तन्मयी बेहेरा 3-0-20-2) पराभूत वि. ओडिशा संघ: 16.3 षटकांत बिनबाद 111 (माधुरी मेहेता नाबाद 49, सरिता मेहेर नाबाद 59, मेताली गवंडर `1-0-13-0, तरन्नुम पठाण 2-0-18-0, प्रीती यादव 4-0-17-0, पूर्वा भाईडकर 3.3-1-11-0, सुनंदा येत्रेकर 3-0-21-0, श्रेया परब 1-0-9-0, संजुला नाईक 2-0-20-0).

शिखाची अनुपस्थिती जाणवतेय

गोव्याची हुकमी वेगवान गोलंदाज, महिला कसोटीपटू शिखा पांडे स्पर्धेतील मागील दोन्ही सामन्यांत खेळलेली नाही व तिची अनुपस्थिती संघाला जाणवत आहे. ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश लीग स्पर्धेत ब्रिस्बेन हिट्सतर्फे खेळण्यासाठी रवाना झाली आहे. नव्या चेंडूने सुरेख मारा करणारी शिखा सुरवातीच्या तिन्ही सामन्यांत खेळली होती आणि संघाच्या विजयांत तिची कामगिरी परिणामकारक ठरली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT