Neha Daksh, Yashmita Talwadkar Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Kabaddi: गोमंतकीयांसाठी गोड बातमी!भारतीय महिला कबड्डी संघात गोव्याच्या नेहाची निवड; यश्मितालाही मिळाली मोठी संधी

Goa women’s Kabaddi: नेहा दक्ष हिची भारतीय महिला कबड्डी संघात निवड झाली आहे.यश्मिता, तसेच नेहा यांना दक्षिण रेल्वेने निवडले असून प्रस्ताव पत्र सादर केलेले आहे.

Sameer Panditrao

पणजी: गेली दोन वर्षे राष्ट्रीय पातळीवर गोव्याचे प्रतिनिधित्व करणारी नेहा दक्ष हिची भारतीय महिला कबड्डी संघात निवड झाली आहे. इराणमध्ये ५ ते ९ मार्च या कालावधीत आशियाई महिला कबड्डी स्पर्धा खेळली जाईल.

मूळ उत्तर प्रदेश येथील नेहा मागील दोन वर्षांपासून गोव्यातर्फे राष्ट्रीय स्पर्धेत खेळते. २१ वर्षीय खेळाडू गतवर्षी राष्ट्रीय ज्युनियर महिला स्पर्धेत गोव्याकडून खेळताना ब्राँझपदकाची मानकरी ठरली होती.

यावर्षी तिने हरियाना येथे झालेल्या ७१व्या राष्ट्रीय सीनियर कबड्डी स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत गोव्याने उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारताला साखळी गतविजेत्या हरियाना पराभवाचा धक्का दिला होता.

यश्मिता हिलाही मिळाली मोठी संधी

गोव्याच्या सीनियर महिला कबड्डी संघातील आणखी एक प्रमुख खेळाडू यश्मिता तळवडकर हिला मोठी संधी प्राप्त झाली आहे. यश्मिता, तसेच नेहा यांना दक्षिण रेल्वेने निवडले असून प्रस्ताव पत्र सादर केलेले आहे. सावळे-पिळर्ण येथील २१ वर्षीय यापूर्वी तीन वर्षे ज्युनियर पातळीवर गोव्याची सदस्य असून गतवर्षी राष्ट्रीय स्पर्धेत ब्राँझपदक जिंकले होते. यावर्षी हरियानात झालेल्या ७१व्या राष्ट्रीय सीनियर महिला कबड्डी स्पर्धेत यश्मिता हिने गोव्याचे नेतृत्व केले होते.

खेळाडूंचे अभिनंदन

भारतीय महिला कबड्डी संघात निवड झालेली नेहा दक्ष, तसेच दक्षिण रेल्वेने निवड केलेली यश्मिता तळवडेकर यांचे गोवा कबड्डी संघटनेचे आश्रयदाते दत्ताराम कामत, अध्यक्ष रुक्मिणी कामत, तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

Trigrahi Yog 2026: सूर्य, बुध आणि शुक्राचा महासंगम! 17 अक्टोबरपासून सुरु होणार 'या' राशींचा सुवर्णकाळ; जबरदस्त धनलाभाचा योग

SCROLL FOR NEXT