Babu Gaonkar Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

National Games: राष्ट्रीय स्पर्धेत पाचवेळा ‘पोडियम’ मिळविणारा गोमंतकीय! 'बाबू' ठऱतोय हुकमाचा एक्का

Babu Gaonkar: उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेच्या ३८ व्या आवृत्तीत रविवारपर्यंत या खेळात राज्याला एकूण सहा पदके मिळाली.

Sameer Panditrao

पणजी: मॉडर्न पेंटॅथलॉन खेळ गोव्यासाठी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुन्हा पदकविजेता ठरला आहे. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेच्या ३८ व्या आवृत्तीत रविवारपर्यंत या खेळात राज्याला एकूण सहा पदके मिळाली. दोन वर्षांपूर्वी गोव्यात झालेल्या ३७ व्या स्पर्धेत याच खेळात राज्याला एका सुवर्णासह आठ पदके मिळाली होती.

मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये हुकमी ॲथलीट बाबू गावकर आता राज्यातर्फे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात ‘विक्रमी’ पदकवीर ठरला आहे. दोन स्पर्धांत मिळून त्याने एकूण पाच पदके (१ सुवर्ण व ४ रौप्य) जिंकली असून गोव्यातर्फे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तो सर्वाधिक ‘पोडियम फिनिश’ मिळविणारा क्रीडापटू ठरला आहे. २४ वर्षीय बाबूने २०२३ साली लेझर रन पुरुष वैयक्तिक प्रकारात सुवर्ण, तर मिश्र रिलेत रौप्यपदक जिंकले होते. यंदा शनिवारी त्याने उत्तराखंडमध्ये तीन रौप्यपदके पटकावली.

सूरज दत्ता वेळीपची चार पदके

मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये ट्रायथल प्रकारातील ॲथलीट सूरज दत्ता वेळीप याने आता एकूण चार पदके जिंकून बाबू गावकरनंतर दुसरा क्रमांक मिळविला आहे. सूरज याने २०२३ मध्ये ट्रायथल प्रकारात दोन ब्राँझपदके जिंकली होती. रविवारी त्याला आणखी दोन ब्राँझपदके मिळाली. त्याने ट्रायथल मिश्र रिले व पुरुष सांघिक प्रकारात पदक प्राप्त केले.

दृष्टिक्षेपात उत्तराखंड स्पर्धेत गोवा

रविवारी मॉडर्न पेंटॅथलॉनमधील ट्रायथल प्रकारात गोव्याला २ ब्राँझपदके

मिश्र रिले (प्रतीक्षा वेळीप, सूरज दत्ता वेळीप) आणि पुरुष सांघिक (सूरज दत्ता वेळीप, उदेश माजिक, सुनील गावकर) प्रकारात तिसरा क्रमांक

मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये यंदा आतापर्यंत गोव्याची एकूण ६ पदके (३ रौप्य व ३ ब्राँझ)

एकंदरीत स्पर्धेत गोव्याला एकूण ९ पदके (२ सुवर्ण, ३ रौप्य, ४ ब्राँझ)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT