V koushik Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

V Koushik: कर्नाटकला रामराम, गोवा संघाला 'कौशिक'चा आधार! धडाकेबाज गोलंदाज व्ही. कौशिक आता गोव्याकडून खेळणार

V Koushik Joins Goa Cricket Team: आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर फलंदाजांना घाम फोडणाऱ्या या धडाकेबाज गोलंदाजाने गोव्याची वाट धरली आहे.

Manish Jadhav

V Kaushik Joins Goa Cricket Team: गेल्या काही वर्षांपासून कर्नाटक संघाच्या गोलंदाजीचं नेतृत्व करणारा आघाडीचा मध्यमगती गोलंदाज व्ही. कौशिक आता गोव्याकडून खेळताना दिसणार आहे. आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर फलंदाजांना घाम फोडणाऱ्या या धडाकेबाज गोलंदाजाने गोव्याची वाट धरली आहे. 2019 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण करणारा 32 वर्षीय कौशिक आगामी हंगामात गोव्याकडून खेळणार आहे. मंगळवारी (2 जुलै) कौशिकला कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने (केएससीए) ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिले.

दरम्यान, क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी कौशिकने कॉर्पोरेट नोकरीला लाथ मारली होती. त्याने 23 प्रथम श्रेणी सामने खेळले असून ज्यामध्ये त्याने 2.13 च्या प्रभावी इकॉनॉमी रेटने 93 विकेट्स घेतल्या आहेत.

दुसरीकडे, अचूकतेवर जास्त आणि वेगावर कमी अवलंबून असलेल्या कौशिकला काही वर्षांपूर्वी दुर्लक्षित करण्यात आले, परंतु संघात पुन्हा कमबॅक करण्यासाठी तो कठोर मेहनत घेत होता. गेल्या हंगामात नियमित प्रसिद्ध कृष्णा आणि विद्वात कवेरप्पा यांची अनुपस्थित आणि हंगामाच्या मध्यात वैशाक विजयकुमारला दुखापत झाल्यानंतर मिळालेल्या संधीला लाभ घेत कौशिकने संघात पुनरागमन करत आपला जलवा दाखवून दिला.

गेल्या हंगामात कर्नाटकच्या (Karnataka) विजय हजारे ट्रॉफी विजयात संयुक्तपणे सर्वाधिक विकेट्स घेणारा (18 विकेट्स) कौशिक TOI शी बोलताना म्हणाला की, "मी 32 वर्षांचा आहे आणि गेल्या काही महिन्यांपासून मी माझ्या भविष्याबद्दल विचार करत आहे.''

कौशिक पुढे म्हणाला की, ''मला माझे गृहराज्य मोठ्या उत्साहात सोडायचे होते. मला माहित आहे की, मी आणखी काही वर्षे क्रिकेट खेळू शकतो. मात्र कर्नाटकातील तरुणांसाठी जागा सोडण्याची वेळ आता आली आहे असे मला वाटते."

"मी विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी जिंकणाऱ्या कर्नाटक संघांचा भाग राहिलो आहे, पण कर्नाटकला रणजी ट्रॉफी जिंकण्यात मदत केली असती तर बरे झाले असते.", अशी खंतही कौशिकने बोलून दाखवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT