Matheesha Pathirana Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Matheesha Pathirana In KKR :चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) एकेकाळचा हुकमी एक्का असलेल्या पाथिरानाला खरेदी करण्यासाठी अनेक संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली.

Manish Jadhav

Matheesha Pathirana: आयपीएल 2026 च्या मिनी लिलावात (IPL 2026 Auction) खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडत असतानाच श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज मथीशा पाथिराना (Matheesha Pathirana) याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) एकेकाळचा हुकमी एक्का असलेल्या पाथिरानाला खरेदी करण्यासाठी अनेक संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. अखेर कोलकाता नाईट रायडर्सने 18 कोटी रुपयांची प्रचंड मोठी बोली लावत या 22 वर्षीय गोलंदाजाला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले.

2 कोटींची बेस प्राईज, 18 कोटींची बोली!

अबुधाबी येथे सुरु असलेल्या या लिलावात पाथिरानाचे नाव जेव्हा पुकारले गेले, तेव्हा त्याची मूळ किंमत (Base Price) केवळ 2 कोटी रुपये होती. मात्र, त्याच्या गोलंदाजीतील वैविध्य आणि डेथ ओव्हर्समधील अचूकता पाहता त्याच्यासाठी मोठी बोली लागणार हे निश्चित होते. लिलाव सुरु होताच अनेक फ्रँचायझींनी त्याच्यावर बोली लावण्यास सुरुवात केली. विशेषतः केकेआरने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. अंतिमतः 18 कोटी रुपयांवर केकेआरने बाजी मारली आणि पाथिराना आता 'जांभळ्या' जर्सीत दिसणार आहे.

चेन्नईने का सोडले? चाहत्यांमध्ये चर्चा

मथीशा पाथिरानाने 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्जमधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. महेंद्रसिंग धोनीच्या मार्गदर्शनाखाली तो संघाचा महत्त्वाचा भाग बनला होता. त्याच्या वेगळ्या 'स्लिंगी' (Slingy Action) ॲक्शनमुळे त्याला 'बेबी मलिंगा' म्हणून ओळखले जाते. पाथिरानाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 32 सामन्यांत 47 बळी घेतले आहेत. विशेषतः 2023 च्या हंगामात त्याने 12 सामन्यांत 19 बळी घेत सीएसकेला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. असे असूनही, मेगा ऑक्शनच्या रणनीतीमुळे चेन्नईने त्याला रिलीज केले होते, ज्याचा फायदा आता केकेआरने उचलला आहे.

पाथिरानाचा 'डेथ ओव्हर्स'मधील दरारा

केकेआरने पाथिरानावर 18 कोटी खर्च करण्यामागे एक ठोस रणनीती आहे. पाथिराना हा 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्यास सक्षम आहे. त्याची 'यॉर्कर' टाकण्याची क्षमता आणि वेगात केलेले बदल फलंदाजांना गोंधळात टाकतात. केकेआरला अशा एका गोलंदाजाची गरज होती जो शेवटच्या षटकांत (Death Overs) धावा रोखू शकेल आणि विकेट्सही घेऊ शकेल. पॅट कमिन्स किंवा मिचेल स्टार्क यांच्यानंतर पाथिराना केकेआरच्या वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करताना दिसेल.

अनुभव आणि जागतिक स्पर्धांचा फायदा

केवळ 22 वर्षांचा असूनही पाथिरानाचा अनुभव दांडगा आहे. त्याने श्रीलंका राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासोबतच जगभरातील विविध टी-20 लीगमध्ये आपली चमक दाखवली आहे. दबावाच्या परिस्थितीत शांत राहून गोलंदाजी करणे हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. केकेआरच्या ईडन गार्डन्स सारख्या मैदानावर, जिथे सीमारेषा जवळ आहेत, तिथे पाथिरानाचा 'अचूक यॉर्कर' केकेआरसाठी गेम चेंजर ठरु शकतो.

केकेआरची गोलंदाजी आता अधिक धारदार

कॅमेरुन ग्रीनसाठी मोठी रक्कम मोजल्यानंतर केकेआरने पाथिरानाच्या रुपाने आणखी एक मोठा खेळाडू आपल्या ताफ्यात सामील केला आहे. यामुळे केकेआरची गोलंदाजी आता आयपीएलमधील सर्वात घातक आक्रमणांपैकी एक वाटत आहे. आता पाथिराना धोनीच्या 'यलो आर्मी' विरुद्ध जेव्हा 'नाईट रायडर्स'कडून मैदानात उतरेल, तेव्हा तो सामना पाहणे चाहत्यांसाठी पर्वणीच ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT