FC Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

FC Goa: एफसी गोवाच्या विजयामुळे मार्केझ खूश! आता 'पंजाब'चे आव्हान

ISL 2024-25: ताकदवान बंगळूर एफसीला नमवून यंदाच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत घरच्या मैदानावर पहिला विजय साकारलेल्या एफसी गोवाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ संघाच्या उत्कृष्ट कामगिरीने सुखावले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Indian Super League 2024-25 FC Goa VS Punjab Fc

पणजी: ताकदवान बंगळूर एफसीला नमवून यंदाच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत घरच्या मैदानावर पहिला विजय साकारलेल्या एफसी गोवाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ संघाच्या उत्कृष्ट कामगिरीने सुखावले आहेत. बलवान प्रतिस्पर्ध्यास रोखण्याची व्यूहरचना सफल ठरल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शनिवारी रात्री एफसी गोवाने गुणतक्त्यात अग्रस्थानी असलेल्या बंगळूर एफसीला ३-० असे सहज हरविले. घरच्या मैदानावर दोन पराभव आणि एका बरोबरीनंतर त्यांचा हा पहिला विजय ठरला. आता याच मैदानावर येत्या बुधवारी (ता. ६) स्पर्धेत शानदार खेळ करणारा पंजाब एफसीविरुद्ध त्यांची तुल्यबळ लढत होईल. बंगळूरविरुद्ध एफसी गोवाच्या विजयात उत्तरार्धात आर्मांदो सादिकू, ब्रायसन फर्नांडिस व देयान द्राझिच यांनी प्रत्येकी एक गोल केला. बंगळूर एफसीचा हा स्पर्धेतील पहिलाच पराभव ठरला.

एफसी गोवाचे आता सात सामन्यांतून दोन विजयांसह नऊ गुण झाले आहेत. एफसी गोवाने बंगळूरविरुद्ध भक्कम बचावाचे प्रदर्शन घडविताना मोसमात प्रथमच क्लीन शीट राखली. सामन्यानंतर स्पॅनिश प्रशिक्षक मार्केझ म्हणाले, की ``मला वाटतं, की सध्यापेक्षा जास्त गुणांसाठी आम्ही लायक आहोत. आमची कामगिरी चांगली ठरली हे सत्य आहे. बंगळूर एफसीसारख्या ताकदवान संघाला आम्ही संधी दिली नाही. प्रत्यक्षात आम्ही प्रत्येक सामन्यात गोल नोंदवत आहोत. सध्या आमचे आक्रमण धारदार आहे. आम्ही तीन गोल नोंदविले. आम्ही सांघिक पातळीवर वरचढ होतो आणि स्पष्ट विजयाचे हक्कदार होतो.``

बंगळूर एफसीविरुद्धच्या लढतीपूर्वी एफसी गोवास सातत्याने दगा दिला होता. मात्र शनिवारच्या लढतीत संघाने दृढनिश्चयाने खेळताना प्रशिक्षकाच्या नियोजनाची उत्कृष्टपणे अंमलबजावणी करत तीन गुण प्राप्त केले. साहजिकच पुढील लढतीपूर्वी संघाला आत्मविश्वास निश्चितच उंचावलेला असेल.

आयएसएल स्पर्धेच्या व्यस्त वेळापत्रकाविषयी ५६ वर्षीय मार्केझ म्हणाले, की ``त्यांना (खेळाडूंना) खूप धावावे लागले. आमच्याकडे राखीव फळीतही चांगले खेळाडू आहेत. या सामन्यात खेळलेला संघच पुन्हा खेळविण्याविषयी मी साशंक आहे, कारण इतर खेळाडूंचाही आम्हाला वापर करायचा आहे व त्यांच्यापाशी आवश्यक दर्जा आहे.``

बंगळूर एफसीला कोंडीत पकडले

बंगळूर एफसीविरुद्धच्या सामन्यातील रणनीतीबद्दल मार्केझ म्हणाले, की ``बंगळूर एफसी आक्रमण आणि बचावात वेगळ्या शैलीने खेळतो. तीन सेंट-बॅक्स वापरून ते आक्रमक शैलीने खेळतात. बचाव करताना ते ४-४-२ या डायमंड पद्धतीवर भर देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याविरुद्ध खेळताना मुंबई सिटी, पंजाब एफसी व केरळा ब्लास्टर्स यांनी कशाप्रकारे वेगळ्या पद्धतीचा वापर केला याचे आम्ही विश्लेषण केले. त्यानंतर आम्ही (आल्बर्टो) नोग्युएरा व (पेद्रो) कापो यांच्यावर बंधने आणण्याचा प्रयत्न केला. हे दोन्ही खेळाडू चेंडूवर प्रभाव टाकतात. त्यांच्याकडून पेरेरा (दियाझ), सुनील (छेत्री), एडगर (मेंडेझ) यांनी चेंडू मिळतो.``

खेळाडूंचे निर्णायक योगदान

मार्केझ यांनी संघातील खेळाडूंनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, माझ्यामते आयुष (देव छेत्री) याची कामगिरी सामन्यात निर्णायक ठरली. (महंमद) यासीर दुखापतीनंतर आला. ब्रायसन (फर्नांडिस) याने गोल आणि अर्थातच देयान (द्राझिच) याची कामगिरी आहे. ज्या खेळाडूंद्वारे बंगळूर एफसीचा खेळ रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न केला, त्यांच्याबद्दल मी बोलत आहे. मला वाटते की त्यांनी खेळाची उत्तम समज दाखविली. काहीवेळा गोलफलक चांगला असतो, तर काहीवेळा अपेक्षित निकाल मिळत नाहीत. पुन्हा एकदा मला वाटते, की निश्चितच हा मोसम चांगला असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT