Goa Athletics Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Manohar Parrikar Athletics: राज्यस्तरीय ५६वी ‘पद्मभूषण डॉ. मनोहर पर्रीकर स्मृती’ ॲथलेटिक्स स्पर्धा सात ने नऊ ऑगस्ट या कालावधीत बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर होणार आहे.

Sameer Panditrao

पणजी,: राज्यस्तरीय ५६वी ‘पद्मभूषण डॉ. मनोहर पर्रीकर स्मृती’ ॲथलेटिक्स स्पर्धा सात ने नऊ ऑगस्ट या कालावधीत बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर होणार आहे. गोवा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या मान्यतेने आणि गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने स्पर्धा घेण्यात येईल.

स्पर्धा आयोजनाची माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र सावईकर यांनी दिली. यावेळी संघटनेचे सचिव शरेंद्र नाईक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

स्पर्धेत मुला व मुलींच्या गटात ८ वर्षांखालील, १० वर्षांखालील, १२ वर्षांखालील, १४ वर्षांखालील, १६ वर्षांखालील, १८ वर्षांखालील, २० वर्षांखालील वयोगटात, तसेच खुल्या विभागात पुरुष व महिला गटात चुरस असेल. तीन दिवसीय स्पर्धेत एकूण १९० क्रीडा प्रकारात चढाओढ असेल.

स्पर्धेत राज्यातील शालेय, महाविद्यालयीन, क्लब, सरकारी खात्यातील, तसेच वैयक्तिक ॲथलीट्सचा सहभाग अपेक्षित आहे. स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया चार जुलैपासून सुरू होणार असून २७ जुलै रोजी मध्यरात्रीपर्यंत प्रवेशिका स्वीकारल्या जातील. माहितीसाठी स्पर्धक पॅट्रिक सुवारिस, पी. डी. शशिकुमार, डेझिरी परेरा किंवा सोनल शेट्येकर यांच्याकडे संपर्क साधू शकतील.

शिखा पाठक यांची जागतिक स्पर्धेसाठी निवड

गोवास्थित शिखा पाठक यांची चीनमधील चेंगडू येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्या भारतीय जू-जित्सू संघटनेशी संलग्न रेफरी आहेत. जगातील सर्वोत्तम ‘फायटर्स’चा सहभाग असलेल्या जागतिक कॉम्बॅट गेम्सला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची मान्यता आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी (आयटीओ) या नात्याने नियुक्ती झालेल्या शिखा या पहिल्या आशियाई महिला, तसेच पहिल्या भारतीय आहेत. त्यांनी यापूर्वी विविध आंतरराष्ट्रीय जू-जित्सू स्पर्धांत रेफरी-तांत्रिक अधिकारी या नात्याने जबाबदारी पेलली आहे. जागतिक स्पर्धेतील फायटिंग प्रकारात आशियातून फक्त दोघाच, तर जगभरातील एकूण आठ तांत्रिक अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. स्पर्धा ७ ते १७ ऑगस्ट या कालावधीत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT