Chess  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Chess Tournament: गोव्याचे मास्टर कमाल! अमेय, एथनचे पाच गुण, अनुरागने साधली सलग तिसरी बरोबरी

Goa Grandmaster Chess Open 2025: ‘मनोहर पर्रीकर’ गोवा आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत ‘अ’ गटात गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) अमेय अवदी याने गुरुवारी विजय व बरोबरीची नोंद केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: ‘मनोहर पर्रीकर’ गोवा आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत ‘अ’ गटात गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) अमेय अवदी याने गुरुवारी विजय व बरोबरीची नोंद केली. आयएम एथन वाझ याने दिवसातील दोन्ही डावात बरोबरी साधली, तर ग्रँडमास्टर अनुराग म्हामल याने सलग तिसऱ्या डावात अर्ध्या गुणावर समाधान मानले. सहाव्या फेरीत विजय नोंदविणारा आयएम ऋत्विज परब सातव्या फेरीत बलाढ्य प्रतिस्पर्ध्याविरुद्ध पराभूत झाला.

सातव्या फेरीनंतर अमेय व एथने यांचे प्रत्येकी पाच, तर अनुराग व ऋत्विज यांचे समान साडेचार गुण झाले आहेत. स्पर्धा ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू आहे. प्रत्येकी सहा गुणांसह तिघे जण संयुक्त आघाडीवर असून यामध्ये रशियन आयएम अलेक्झांडर स्लिझेव्हेस्की (एलो २३४०), किर्गिझस्तानचा आयएम सेमेतेई तोलोगन (एलो २३५१) व बेलारशियन ग्रँडमास्टर अलेक्झी फेडोरोव यांचा समावेश आहे.

गोमंतकीय बुद्धिबळपटूंचे गुरुवारचे निकाल

‘आयएम’ एथन वाझ (एलो २४१२) बरोबरी वि. नितीन बाबू (एलो २१६९, केरळ), बरोबरी वि. ‘फिडे मास्टर’ आकाश दळवी (एलो २२७८, महाराष्ट्र).

‘आयएम’ अमेय अवदी (एलो २४२२) वि. वि. ‘आयएम’ डेव्हिड गोचेलाश्विली (एलो २२५७, रशिया), बरोबरी वि. श्रीराम उप्पाला (एलो २३०६, तेलंगणा).

ग्रँडमास्टर अनुराग म्हामल (एलो २४९९) बरोबरी वि. ग्रँडमास्टर पी. कार्तिकेयन (एलो २२८६, तमिळनाडू), बरोबरी वि. एल. एन. राम अरविंद (एलो २२४९, तमिळनाडू)

‘आयएम’ ऋत्विज परब (एलो २३७१) वि. वि. ‘आयएम’ मोहसेन एलगाब्री (एलो २१०७, इजिप्त), पराभूत वि. ‘आयएम’ एल. आर. श्रीहरी (एलो २४९४, तमिळनाडू).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT