Mandar Lad  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Chess Tournament: अपराजित मंदार लाडने पटकावले विजेतेपद! खुल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत नोंदवली शानदार कामगिरी

All Goa Open Rapid Chess Tournament: साखळी येथील ब्रह्मा स्पोर्टस क्लबतर्फे घेण्यात आलेल्या अखिल गोवा खुल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत मंदार लाड याने अपराजित कामगिरीसह विजेतेपद पटकावले.

Manish Jadhav

पणजी: साखळी येथील ब्रह्मा स्पोर्टस क्लबतर्फे घेण्यात आलेल्या अखिल गोवा खुल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत मंदार लाड याने अपराजित कामगिरीसह विजेतेपद पटकावले. नऊ फेऱ्यांच्या या स्पर्धेत त्याने आठ विजय व एका बरोबरीसह साडेआठ गुणांची कमाई केली.

दरम्यान, देवेश नाईक याने आठ गुणांसह उपविजेतेपद पटकावले, तर रशियाच्या अनार शायाकबेरोवने साडेसात गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला. आर्यन रायकर, ऋषिकेश परब, सरस पोवार, दिमित्री बेझस्त्राखोव, अनीश नाईक, ह्रदय मोरजकर, अथर्व सावळ, मॅक्सवेल रापोस, मयुरेश देसाई, वेदांत मार्शले, आरव चोपडेकर, आयुष नाईक यांनी अनुक्रमे चौथा ते पंधरावा क्रमांक प्राप्त केला.

वयोगटात आरव नाईक, ऋषी देसाई, रिशित गावस, विहान तारी, प्रचेत मालवणकर, अश्वथ नावेलकर, साई प्रभाकरन, दक्ष रेडकर, त्रिशा पटेकर, येजवारी शेट्ये, वानिया दुकळे, समृथी मालकर, आर्या कामत हेळेकर, तनिशा नाईक देसाई, लावण्या नाईक, वैभवी नाईक, कांता पटेकर, अद्विथ चोडणकर यांना, तर डिचोली तालुका पातळीवर डॉ. अभिजीत वाडकर, प्रभा हरिजन, यथार्थ देसाई, लोहिथ शेट्ये, वर्धन दांडेकर, शुभम शेट्ये, लतिशा कळंगुटकर, लक्ष्मण नाईक, प्रथमेश तिळवे, राम गावस, अनीश गावस, लोकेश कळंगुटकर, नीरजा गावस, नुहझैद शेख, उत्कर्ष मोरजकर, मकरंद जोग यांना बक्षीस मिळाले.

बक्षीस वितरण सोहळ्यास भाजपा महिला मोर्चा प्रभारी सुलोचना सावंत, साखळीच्या नगराध्यक्ष सिद्धी परब, रश्मी देसाई, ब्रह्मा स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष विजय माणगावकर, विशांत देसाई, डिचोली तालुका बुद्धिबळ संघटनेचे सचिव सत्यवान हरमलकर, स्पर्धेचे मुख्य आर्बिटर अरविंद म्हामल यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

SCROLL FOR NEXT