Liston Colaco X
गोंयचें खेळामळ

Liston Colaco: 'गोव्यावर मी निस्सीम प्रेम करतो'; मोहन बागान संघातील गोमंतकीय हुकमी मध्यरक्षकाचे मनोगत वाचा

FC Goa VS Mohun Bagan: फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर एफसी गोवा आणि मोहन बागान यांच्यात इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील महत्त्वपूर्ण लढत होणार आहे. या सामन्यानिमित्त लिस्टन पुन्हा गोव्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Liston Colaco Mohun Bagan vs FC Goa

पणजी: भारतीय फुटबॉलमध्ये सध्या उल्लेखनीय ठरलेला मध्यरक्षक लिस्टन कुलासो याची कारकीर्द कोलकत्यात मोहन बागानतर्फे खेळताना बहरली, मात्र आपण गोमंतकीय असल्याचे तो विसरलेला नसून, ‘माझे घर असलेल्या गोव्यावर मी निस्सीम प्रेम करतो,’ अशी प्रतिक्रिया या २६ वर्षीय खेळाडूने गुरुवारी दिली.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शुक्रवारी (ता. २०) एफसी गोवा आणि मोहन बागान यांच्यात इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील महत्त्वपूर्ण लढत होणार आहे. या सामन्यानिमित्त लिस्टन पुन्हा गोव्यात आला असून ‘घरच्या मैदाना’वर, परंतु विरुद्ध संघातून खेळताना तो केंद्रस्थानी असेल. सासष्टीतील दवर्ली येथील हा प्रतिभाशाली फुटबॉलपटू म्हणाला, ‘‘माझ्यासाठी गोवा आणि मोहन बागान भिन्न आहे. गोवा माझे घर आहे आणि त्यावर मी प्रेम करतो. त्याचवेळी मोहन बागानच्या चाहत्यांचे प्रेम विलक्षण आहे. त्याचा मी आनंद लुटत आहे.’’

दृष्टिक्षेपात कारकीर्द: लिस्टन कुलासोने वयोगट पातळीवर साळगावकर एफसीतर्फे छाप पाडल्यानंतर २०१७ ते २०२० पर्यंत एफसी गोवाचे प्रतिनिधित्व केले. आयएसएलमध्ये २०२०-२१ मोसमात तो हैदराबाद एफसीतर्फे खेळला आणि २०२१-२२ पासून तो कोलकत्यातील मोहन बागानचे प्रतिनिधित्व करत आहे. मार्च २०२१ मध्ये त्याने भारतातर्फे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो राष्ट्रीय संघाचा नियमित सदस्य आहे. मध्यफळीतील अष्टपैलू लिस्टनने आयएसएल स्पर्धेत आतापर्यंत १०७ सामन्यांत १९ गोल व १६ असिस्टची नोंद केली असून यंदा आयएसएल स्पर्धेतील ११ सामन्यांत दोन गोल केले आहेत. मोहन बागानतर्फे लिस्टन २०२३ मध्ये ड्युरँड कप, २०२२-२३ मध्ये आयएसएल करंडक, तर २०२३-२४ मध्ये आयएसएल लीग शिल्ड विजेता ठरला.

आता कोलकत्यात आनंदी

१.कोलकत्यातील वास्तव्याविषयी लिस्टन म्हणाला, की ‘‘मोहन बागानशी करारबद्ध झाल्यानंतर माझा पहिला मोसम कोविड बबलमध्ये गेला आणि तेव्हा स्पर्धा गोव्यातच झाली होती. कोविड काळ संपला आणि आम्ही कोलकत्यात परतलो. तेथील वातावरणात समरस होणे सुरवातीला कठीण ठरले, कारण त्यापूर्वी मी गोव्याबाहेर जास्त खेळलो नव्हतो. आव्हानास सामोरे जाणे आवश्यक होते आणि मी ते स्वीकारले. आता कोलकत्यात मी आनंदी आहे.

२. गोव्यात मात्र मी गोमंतकीय असतो. मोहन बागान क्लबसमवेत मी २०२७ पर्यंत करारबद्ध आहे आणि खूश आहे.’’ यंदा प्रशिक्षक होजे मोलिना यांच्या मार्गदर्शनाखाली लिस्टन कुलासो मोहन बागान संघात प्रमुख भूमिका निभावत आहे. त्याने प्रशिक्षकाचा विश्वास संपादन केला आहे. ‘‘त्यांनी भारतीय फुटबॉलपटूंवर मेहनत घेतली असून आमचा आत्मविश्वास उंचावला आहे,’’ असे प्रशिक्षक मोलिना यांच्याविषयी लिस्टन म्हणाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT