Inter State Swimming Competition Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Inter State Swimming Competition: गोव्याचे जलतरणपटू 'लय भारी'! आंतरराज्य जलतरण स्पर्धेत दाखवला जलवा; पदकांची केली कमाई

Khelo India Goa Swimming Success: कांपाल येथील खेलो इंडिया गोवा राज्य उत्कृष्टता केंद्रातील जलतरणपटूंनी बेळगाव येथे झालेल्या आंतरराज्य जलतरण स्पर्धेत पदकांची कमाई केली.

Manish Jadhav

पणजी: कांपाल येथील खेलो इंडिया गोवा राज्य उत्कृष्टता केंद्रातील जलतरणपटूंनी बेळगाव येथे झालेल्या आंतरराज्य जलतरण स्पर्धेत पदकांची कमाई केली. स्वीमर क्लब बेळगाव आणि ॲक्वेरियस क्लब बेळगाव यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत गोव्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जलतरणपटूंनी भाग घेतला होता.

कांपाल खेलो इंडिया राज्य उत्कृष्टता केंद्रातील आर्यन शर्मा, निरंजनी बोर्डे, आरोही बोर्डे, श्लोक गाड, अद्वैत दळवी, पूर्वी नाईक, तन्मय चौगुले यांनी पदके पटकावली. त्यांना केंद्राचे मुख्य प्रशिक्षक टी. ए. सुजित यांचे मार्गदर्शन लाभले.

पदक विजेते जलतरणपटू: आयर्न शर्मा (मुलगे १५-३४ गट) : ५० मीटर फ्रीस्टाईस सुवर्ण, १०० मीटर फ्रीस्टाईल ब्राँझ, निरंजनी बोर्डे (मुली १५-३४ गट) : ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक सुवर्ण, १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक सुवर्ण, २०० मीटर वैयक्तिक मेडली सुवर्ण, १०० मीटर बॅकस्ट्रोक ब्राँझ, आरोही बोर्डे (मुली १३-१४ गट) : १०० मीटर बटरफ्लाय सुवर्ण, ५० मीटर बटरफ्लाय रौप्य, ५० मीटर फ्रीस्टाईल रौप्य, २०० मीटर वैयक्तिक मेडली रौप्य, १०० मीटर फ्रीस्टाईल ब्राँझ, श्लोक गाड (मुलगे ११-१२ गट) : ५० मीटर फ्रीस्टाईल ब्राँझ, १०० मीटर फ्रीस्टाईल ब्राँझ, अद्वैत दळवी (मुलगे ११-१२ गट) : ५० मीटर फ्रीस्टाईल सुवर्ण, १०० मीटर फ्रीस्टाईल सुवर्ण, १०० मीटर बॅकस्ट्रोक सुवर्ण, १०० मीटर वैयक्तिक मेडली रौप्य, ५० मीटर बॅकस्ट्रोक ब्राँझ, पूर्वी नाईक (मुली ११-१२ गट) : ५० मीटर फ्रीस्टाईल सुवर्ण, १०० मीटर फ्रीस्टाईल रौप्य, ५० मीटर बटरफ्लाय रौप्य, १०० मीटर बटरफ्लाय रौप्य, २०० मीटर वैयक्तिक मेडली रौप्य, तन्मय चौगुले (मुलगे ९-१० गट) : १०० मीटर फ्रीस्टाईल रौप्य, ५० मीटर फ्रीस्टाईल ब्राँझपदक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT