joao felix 
गोंयचें खेळामळ

पोर्तुगीज फुटबॉलपटूसोबत सेल्फीचा मोह भोवला, केरळच्या फॅनला गोव्यात तुरुंगात काढावी लागली रात्र; FC Goa ला होऊ शकतो 8 लाखांचा दंड

Portuguese footballer selfie incident: सुरक्षा रक्षकांनी २७ वर्षीय चाहत्याला बाहेर काढले. पोलिसांनी याप्रकरणी केरळच्या व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

Pramod Yadav

मडगाव: एफसी गोवा आणि अल नस्सर यांच्यात एएफसी लीगमधील झालेल्या सामन्यात एका फॅनने सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले. सुरक्षा कडं भेदून केरळचा एक फॅन मैदानात दाखल झाला व त्याने पोर्तुगालच्या खेळाडूला मिठी मारुन सेल्फी काढला. सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या फॅनविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

फातोर्डा येथील नेहरु मैदानावर एफसी गोवा आणि अल नस्सर यांच्यात बुधवारी सामना रंगला. यावेळी एक केरळच्या एका फुटबॉलप्रेमीने मैदानात धाव घेत पोर्तुगालच्या जाँव फेलिक्सला मिठी मारली. यानंतर त्याने आवडत्या खेळाडूसोबत सेल्फीही काढला. यानंतर सुरक्षा रक्षकांनी २७ वर्षीय चाहत्याला बाहेर काढले. पोलिसांनी याप्रकरणी केरळच्या व्यक्तीला अटक करुन त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

फातोर्डा पोलिसांनी केरळच्या या व्यक्तीला अटक करुन पोलिस स्थानकात घेऊन जात भारतीय न्याय संहीता कलम १२५ आणि २३३ (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या व्यक्तीला संपूर्ण रात्र तुरुंगात काढावी लागली. एएफसी लीगदरम्यान एफसी गोवा आणि अल नस्सर यांच्यात सामना रंगला होता त्यावेळी ही घटना घडली. 

फुटबॉलपटूंसाठी फातोर्डा मैदानात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, सुरक्षा रक्षकांचं कडं भेदून हा फॅन मैदानात दाखल झाला होता. सामान्य नागरिकांना निषिद्ध असलेल्या भागात प्रवेश करुन खेळाडुंच्या सुरक्षेचे उल्लंघन केल्याप्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे.

एएफसीनुसार अशा सुरक्षा नियमांचे उल्लंघन गंभीर गुन्हा मानला जातो. त्यासाठी आठ लाख ८० हजार दंडाची देखील तदतूद आहे. त्यामुळे आयोजक एससी गोवाला या दंडा भूर्दंड पडू शकतो. दरम्यान, फातोर्डा पोलिसांनी या व्यक्तीची जामीनावर सुटका केली तसेच, त्याच्या मोबाईलमधील फोटोही डिलीट केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Winter Session 2026: विधानसभेत विधेयकांचा 'पंच'! शिक्षण, कृषी, व्यापार अन् पंचायतींसाठी कायदे मंजूर; अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राज्याच्या हिताचे मोठे निर्णय

Operation Sindhur: 'ऑपरेशन सिंदूर'चा थरार! भारतीय लष्कराने जारी केला सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ; पाकच्या एअरबेस आणि रडार यंत्रणेच्या विध्वंसाचा पुरावा जगासमोर

"ऑपरेशन सिंदूर सर्वात मोठा हल्ला, अल्लाहनचं आम्हाला वाचवलं," लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरची जाहीर कबुली; पाकड्यांचा पुन्हा बुरखा फाटला

Goa Winter Session 2026: "आधार कार्ड म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही!" मुख्यमंत्री सावंतांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं; मतदार यादीतून गैर-नागरिकांची नावं हटवणार

Indian Army: भविष्यातील युद्धांसाठी भारतीय सेना सज्ज! 'फ्युचर रेडी' फोर्स म्हणून जगात ठरणार वरचढ, लष्करप्रमुखांनी शत्रूंना दिली तंबी VIDEO

SCROLL FOR NEXT