ISL 2024-25 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL 2024-25: आता उत्सुकता 'प्ले-ऑफ फेरी'ची, सेमी फायनलसाठी 'या' 4 संघात 'कांटे की टक्कर'

Indian Super League: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील साखळी फेरीनंतर करंडकासाठी होणाऱ्या प्ले-ऑफ फेरीसाठी आता चुरस आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील साखळी फेरीनंतर करंडकासाठी होणाऱ्या प्ले-ऑफ फेरीसाठी आता चुरस आहे. या लढती भारताच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल लढतींचा टप्पा झाल्यानंतर खेळल्या जातील. दोन संघांचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित असल्याने बाकी दोन जागांसाठी चार संघांत चढाओढ असेल.

लीग शिल्ड विजेत्या मोहन बागानने ५६ गुणांसह, तर एफसी गोवाने ४८ गुणांसह अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक मिळवून आयएसएल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत थेट प्रवेश केला आहे. साखळी फेरी गुणतक्त्यातील सध्याच्या क्रमवारीनुसार अनुक्रमे तिसऱ्या ते सहाव्या क्रमांकावरील संघांत बाद पद्धतीने होणाऱ्या प्ले-ऑफ सामने होतील.

यामध्ये नॉर्थईस्ट युनायटेड विरुद्ध जमशेदपूर एफसी, तसेच बंगळूर एफसी विरुद्ध मुंबई सिटी एफसी अशा लढती नियोजित आहेत. या सामन्यांतील विजयी संघ उपांत्य फेरीत दाखल होतील. बंगळूर एफसी, नॉर्थईस्ट युनायटेड आणि जमशेदपूर एफसी या तिन्ही संघांचे प्रत्येकी ३८ गुण झाले, तर मुंबई सिटीच्या खाती ३६ गुण जमा झाले.

उपांत्य फेरीत मोहन बागानविरुद्ध नॉर्थईस्ट युनायटेड व जमशेदपूर एफसी यांच्यातील विजेता संघ खेळेल, तर एफसी गोवासमोर बंगळूर आणि मुंबई सिटी यांच्यातील विजेत्या संघाचे आव्हान असेल. प्ले-ऑफ फेरीतील सामन्यांचे अधिकृत वेळापत्रक अजून ‘आयएसएल’तर्फे जाहीर करण्यात आलेले नाही. उपांत्य फेरी दोन टप्प्यांत होणार आहे.

ओडिशा एफसी (३३ गुण), केरळा ब्लास्टर्स (२९), ईस्ट बंगाल व पंजाब एफसी (प्रत्येकी २८), चेन्नईयीन एफसी (२७), हैदराबाद एफसी (१८) व मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लब (१३) या संघांना अनुक्रमे सातवा ते तेरावा क्रमांक मिळाल्यामुळे त्यांचे आव्हान साखळी फेरीतच आटोपले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रवींचा वारसा पुढे कोण चालवणार? रॉय का रितेश कोणाला मिळणार उमेदवारी? फोंड्यात लवकरच होणार पोटनिवडणूक

Viral Video: दिल्ली हायकोर्टात ऑनलाईन सुनावणी दरम्यान वकिलानं घेतला महिलेचा कीस; नंतर काय घडलं? जाणून घ्या

15 मिनिटांच्या आत पाकिस्तानी सैन्याने केले 'सरेंडर', तालिबानने शस्त्रेही घेतली हिसकावून; रणगाडे आणि शस्त्रे जप्त केल्याचा दावा VIDEO

Ravi Naik: गोंयचो पात्रांव अनंतांन विलीन! रवी नाईक यांना 21 बंदुकींच्या सलामीसह अखेरचा निरोप

Bicholim: मोठी दुर्घटना टळली! डिचोलीत सिलिंडर गळतीमुळे शेगडी पेटली, फ्लॅटमालक आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT