Manolo Marquez Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL 2024-25: FC Goa दुसरा क्रमांक पटकावणार का? काय म्हणाले प्रशिक्षक मार्केझ? वाचा..

FC Goa ISL Matches: एफसी गोवाने बुधवारी रात्री मुंबई येथे मुंबई सिटीला ३-१ फरकाने नमवून आपला दावा भक्कम केला, त्यावेळी संघाविरुद्धची १३ सामन्यांची विजयाविना मालिका संपुष्टात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत ‘शिल्ड’ पटकावण्याच्या शर्यतीत मोहन बागानपाशी सात गुणांची आघाडी असून सद्यःस्थितीत एफसी गोवासाठी अव्वल ठरण्याची अंधूक शक्यता आहे, तरीही स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावण्याची चांगली संधी असेल.

सध्या प्रत्येकी २० सामने खेळल्यानंतर मोहन बागानचे ४६ गुण, तर एफसी गोवाचे ३९ गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावरील जमशेदपूर एफसी (३४ गुण) गुरुवारी नॉर्थईस्ट युनाटेडविरुद्ध (३२ गुण) २-० फरकाने पराभूत झाले. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावरील एफसी गोवा जवळच्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत पाच गुणांची पुढे आहे.

एफसी गोवाने बुधवारी रात्री मुंबई येथे मुंबई सिटीला ३-१ फरकाने नमवून आपला दावा भक्कम केला, त्यावेळी त्यांनी मुंबईतील संघाविरुद्धची १३ सामन्यांची विजयाविना मालिका संपुष्टात आली. एफसी गोवाच्या विजयात इकेर ग्वॉर्रोचेना याने दोन, तर बोर्हा हेर्रेरा याने एक गोल केला. त्यांचा पुढील सामना २२ फेब्रुवारीस फातोर्डा येथे केरळा ब्लास्टर्सविरुद्ध होईल.

गोलरक्षक ऋतिक तिवारीने प्रतिस्पर्धी खेळाडूस गोलक्षेत्रात अडथळा आणल्यामुळे मुंबई सिटीला पेनल्टी फटक्यावर पिछाडी एका गोलने कमी करता आली, मात्र ऋतिकला रेड कार्ड मिळाले नाही याबद्दल मार्केझ समाधानी दिसले. याविषयी ते म्हणाले, की “आम्ही शेवटच्या क्षणी स्वीकारलेल्या गोलबद्दल निराश आहे, कारण त्यामुळे आमच्या गोलरक्षकाला पुढील सामन्यासाठी गमवावे लागले असते. सुदैवाने फाउल बॉक्समध्ये झाला आणि त्यामुळे पेनल्टी मिळाली; जर तो बॉक्सच्या बाहेर झाला असता, तर रेड कार्ड मिळाले असते.’’

‘टॉप थ्री’बाबत मार्केझ आशावादी

मुंबई सिटीला नमविल्यानंतर एफसी गोवाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी सांगितले, की ‘‘आम्ही एक कठीण सामना जिंकलो हे महत्त्वाचे आहे. आता आम्हाला पहिल्या तीन संघांत चांगली संधी आहे. आता काय होते ते पाहू. या प्रकारच्या सामन्यांत विशेषतः मोसम संपण्याच्या वाटेवर असताना प्रतिस्पर्ध्यांवर अगोदर करणे महत्त्वाचे ठरते, कारण तुम्ही तणावाखाली असता, तुम्हाला विजय आवश्यक असतो. सध्या मोहन बागान सुपर जायंट शिल्डसाठी आणि इतर संघ अव्वल, दुसऱ्या स्थानावर पोहोचण्यासाठी, तसेच प्ले-ऑफसाठी लढत आहेत.’’ शिल्ड जिंकण्यासाठी आपल्या संघाला जास्त संधी नसली, तरी काही प्रमाणात शक्यता नक्कीच आहे, असे ५६ वर्षीय स्पॅनिश मार्गदर्शक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: जोडीदारासह 'निवांत' ठिकाणी जायचंय? गोवा ठरेल रोमँटिक गेटवे, वाचा परफेक्ट टूर गाईड

Viral Video: ''पडला तरी पठ्ठ्यानं बिअरचा कॅन सोडला नाही...'', बेदरकार तरुणांचा व्हिडिओ व्हायरल, नशेतील स्टंट पडला महागात; नेटकऱ्यांनीही घेतली मजा

Gold Theft Case: नामवंत ज्वेलरी शोरुममधून लंपास केलं 2.5 कोटींचं सोनं, चोरीच्या पैशांतून घेतली कोट्यवधींची मालमत्ता, लखनौच्या 'कोमल'चा पर्दाफाश!

प्रतीक्षा संपली! रोनाल्डो FC गोवाशी भिडणार; कधी अन् कुठे रंगणार सामना? जाणून घ्या सर्व माहिती

Virat Kohli Net Worth: लक्झरी लाईफस्टाईल, ब्रँड एंडोर्समेंटमधून कोट्यवधींची कमाई, आलिशान कारचं कलेक्शन; किंग कोहलीची नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क!

SCROLL FOR NEXT