Indian Super League 2024-25 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL 2024-25: आयएसएलचा थरार आजपासून! पहिल्याच सामन्यात मोहन बागान-मुंबई सिटी भिडणार

Indian Super League: पहिला सामना गतमोसमातील लीग विजेता मोहन बागान सुपर जायंट्स व करंडक विजेता मुंबई सिटी एफसी यांच्यात

गोमन्तक डिजिटल टीम

Indian Super League Season 11

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या अकराव्या मोसमाला ता. १३ पासून सुरवात होत आहे. कोलकता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर स्पर्धेतील पहिला सामना गतमोसमातील लीग विजेता मोहन बागान सुपर जायंट्स व करंडक विजेता मुंबई सिटी एफसी यांच्यात होईल.

मोहन बागान नवे प्रशिक्षक होजे मोलिना यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असून लीग विजेतेपद राखण्यासाठी ते इच्छुक आहेत. मोलिना यांच्यासाठी आयएसएल स्पर्धा नवी नाही. २०१६ साली ते कोलकत्यातील एटीके संघाचे प्रशिक्षक होते. मोहन बागानने यापूर्वी २०२०-२१ व २०२१-२२ मोसमात सलामीची लढत जिंकून मोहिमेस सुरवात केली होती, पण त्यांच्यासमोर मुंबई सिटीचे कडवे आव्हान असेल. या संघाविरुद्ध आतापर्यंत दहा आयएसएल लढतीत मोहन बागानने फक्त एकच विजय नोंदविला आहे. गतमोसमात एप्रिलमध्ये मुंबई सिटीविरुद्ध लीग विजेतेपदाच्या लढतीत मोहन बागानने महत्त्वपूर्ण विजय नोंदविला होता.

पेत्र क्रॅटकी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई सिटी आणखी एका मोसमात यशस्वी कामगिरीसाठी प्रयत्नशील आहे. गतमोसमातील मध्यास प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर मुंबई सिटीला करंडक जिंकून देण्यात क्रॅटकी यांनी महत्त्वपूर्ण वाटा उचलला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT