Indian Super League 2024 FC Goa VS Hyderabad
पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सलग तीन सामने जिंकलेल्या एफसी गोवाने बुधवारी (ता.४) हैदराबाद एफसीविरुद्धही पूर्ण गुणांची कमाई केल्यास त्यांना गुणतक्त्यात तिसरा क्रमांक मिळेल. हैदराबाद एफसी व एफसी गोवा यांच्यातील सामना बुधवारी हैदराबाद येथील जीएमसी बालयोगी स्टेडियमवर खेळला जाईल.
गतमोसमात मार्केझ यांच्याच मार्गदर्शनाखाली एफसी गोवाने हैदराबादविरुद्धच्या दोन्ही सामने जिंकले होते. आता त्यांनी मागील चार लढतीत बरोबरीनंतर ओळीने तीन सामने जिंकले आहेत. एफसी गोवाचे सध्या नऊ सामन्यांतून चार विजय, तीन बरोबरी व दोन पराभव या कामगिरीसह १५ गुण आहेत.
थांगबोई सिंगटो यांच्या मार्गदर्शनाखालील हैदराबाद एफसी संघ सध्या संघर्ष करताना दिसत आहे. नऊ लढतीत दोन विजय, एक बरोबरी व सहा पराभवांमुळे त्यांच्या खाती फक्त सात गुण आहेत. एफसी गोवाविरुद्धच्या लढतीपूर्वी हैदराबादला ओडिशा एफसीविरुद्ध ०-६, तर मुंबई सिटीविरुद्ध ०-१ फरकाने पराभव पत्करावा लागला.
सध्या आयएसएल गुणतक्त्यात मोहन बागान व बंगळूर एफसीचे प्रत्येकी २० गुण आहेत. ओडिशा एफसी, नॉर्थईस्ट युनायटेड, पंजाब, एफसी गोवा व जमशेदपूर एफसी या पाच संघांचे प्रत्येकी १५ गुण झाले आहेत.
सध्याची कामगिरी पाहता मानोलो मार्केझ यांना आयएसएलमधील प्रशिक्षक या नात्याने शंभराव्या सामन्यात पन्नासाव्या विजयाची संधी असेल. मार्केझ २०२२-२३ पर्यंत हैदराबादचे मार्गदर्शक होते, आता गतमोसमापासून ते एफसी गोवाचे प्रशिक्षकपद भूषवत आहेत. आपल्या पूर्वाश्रमीच्या संघाविरुद्ध विजयाच्या पूर्ण तीन गुणांचे लक्ष्य त्यांनी बाळगले आहे.
एकमेकांविरुद्ध १० लढती, एफसी गोवाचे ५, तर हैदराबादचे ३ विजय, २ बरोबरी
गतमोसमात एफसी गोवा हैदराबाद येथे २-०, तर फातोर्डा येथे ४-० फरकाने विजयी
यंदा अवे मैदानावर एफसी गोवा अपराजित, २ विजय आणि २ बरोबरी
एफसी गोवा सलग ४ सामने अपराजित, ३ विजय, १ बरोबरी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.