Indian Racing League 2026 In Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Indian Racing League: थ्रिल आणि ॲक्शन! मोपा विमानतळाजवळ रंगणार 'इंडियन रेसिंग लीग'चा थरार; 6 संघांमध्ये चुरस, 'येथे' पाहता येणार Live streaming

Indian Racing League In Goa: निसर्गरम्य किनारे आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याची ओळख आता जागतिक 'स्पोर्ट्स हब' म्हणून होणार आहे.

Sameer Amunekar

पणजी: निसर्गरम्य किनारे आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याची ओळख आता जागतिक 'स्पोर्ट्स हब' म्हणून होणार आहे. गोव्यात 'इंडियन रेसिंग लीग' (Indian Racing League 2026) अंतर्गत स्ट्रीट सर्किट रेसिंगचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १४ आणि १५ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्तर गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (Manohar International Airport) परिसरात ही हाय-स्पीड शर्यत रंगणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या स्पर्धेची घोषणा करताना, गोव्याला जागतिक क्रीडा नकाशावर नेण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे.

मोपा विमानतळाजवळ तात्पुरते स्ट्रीट सर्किट

या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही शर्यत कोणत्याही कायमस्वरूपी ट्रॅकवर न होता, मोपा विमानतळाजवळील सार्वजनिक रस्त्यांवर तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या सर्किटवर होणार आहे.

या सर्किटची लांबी २.०६४ किलोमीटर असून यामध्ये १२ आव्हानात्मक वळणे आहेत. बॅरियर्स, अरुंद वळणे आणि वेगवान स्ट्रेचमुळे चालकांच्या कौशल्याची येथे मोठी कसोटी लागणार आहे. यापूर्वी ही शर्यत वास्को येथे होणार होती, मात्र स्थानिक कारणांमुळे आयोजकांनी ठिकाणात बदल करून ते मोपा येथे हलवले आहे.

सहा शहरांच्या संघांमध्ये रंगणार चुरस

ही स्पर्धा २०२५-२६ च्या इंडियन रेसिंग लीग हंगामातील चौथी फेरी असणार आहे. यामध्ये सहा शहरांचे प्रतिनिधित्व करणारे संघ सहभागी होणार असून, सर्व चालक 'वुल्फ GB08 थंडर' (Wolf GB08 Thunder) ही एकसारखीच शक्तिशाली वाहने चालवतील. प्रत्येक संघात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चालकांसह एका महिला चालकाचा समावेश अनिवार्य आहे. त्यामुळे ही स्पर्धा केवळ वेगाची नसून विविधतेची आणि समान संधीची एक उत्तम झलक ठरेल.

पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला मिळणार चालना

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मते, या रेसिंग फेस्टिव्हलमुळे गोव्यातील क्रीडा पर्यटनाला मोठी चालना मिळेल. या दोन दिवसांच्या कार्यक्रमामुळे स्थानिक व्यवसाय, हॉटेल आणि वाहतूक क्षेत्राला आर्थिक लाभ होईल. तसेच, गोव्यातील तरुणांना अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि इव्हेंट मॅनेजमेंट यांसारख्या क्षेत्रांत करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

कुठे आणि कशी पाहाल ही शर्यत?

रेसिंग शौकिनांसाठी ही शर्यत पाहण्याची सुवर्णसंधी आहे. या स्पर्धेची तिकिटे 'डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटो' (District by Zomato) या ॲपवर उपलब्ध होणार आहेत. जे प्रेक्षक प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी 'जिओ हॉटस्टार' (JioHotstar) वर लाईव्ह स्ट्रीमिंग आणि 'स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २' (Star Sports Select 2) या चॅनेलवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Old Buses in Goa: कालबाह्य बसगाड्यांमुळे गोव्याची हवा झाली विषारी! प्रदूषणाचे नियम धाब्यावर; प्रवाशांचा जीव टांगणीला

BCCI Central Contracts: रोहित-विराटचं होणार 'डिमोशन'? BCC लवकरच घेणार मोठा निर्णय; जडेजा अन् बुमराहालाही फटका

Feista Do Pavo: ..लोकांचा, लोकांद्वारे आणि लोकांसाठी असणारा ‘फेस्ता दो पावो’

Tourist Safety: पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गोवा सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; हॉटेल नोंदणीचे नियम बदलले! आता 'Fire NOC' बंधनकारक

VIDEO: महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या 'DGP'वर निलंबनाची कारवाई, Viral व्हिडिओनंतर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT