Divya Deshmukh Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

FIDE World Cup 2025: नागपूरची युवा ग्रँडमास्टर दिव्या देशमुख गोव्यात दाखवणार करिष्मा! 'फिडे' वर्ल्डकपमध्ये मिळाली वाइल्ड कार्ड एंट्री

Divya Deshmukh Wildcard Entry: बुद्धिबळात भारताचे नाव जगभरात उंचावणारी नागपूरची युवा ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिला एक मोठी संधी मिळाली आहे.

Manish Jadhav

Indian Grandmaster Divya Deshmukh: बुद्धिबळात भारताचे नाव जगभरात उंचावणारी नागपूरची युवा ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिला एक मोठी संधी मिळाली आहे. 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात होणाऱ्या 'फिडे' विश्वचषक 2025 (FIDE World Cup 2025) स्पर्धेसाठी तिला वाइल्ड कार्ड देण्यात आले आहे. स्पर्धेतून एका खेळाडूने ऐनवेळी माघार घेतल्यामुळे दिव्याला हा बहुमान मिळाला आहे.

19 वर्षीय दिव्याने अलीकडेच 'फिडे ग्रँड स्विस' स्पर्धेत भाग घेतला होता आणि तिची कामगिरी उत्कृष्ट होती. तिच्या याच कामगिरीमुळे तिला विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे. ही स्पर्धा जिंकणे तिच्यासाठी एक मोठी कामगिरी ठरु शकते.

'फिडे'ने (International Chess Federation) याबाबत माहिती देताना सांगितले की, एका सहभागी खेळाडूने ऐनवेळी माघार घेतल्यामुळे दिव्याला ही संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे, चीनच्या (China) प्रसिद्ध महिला खेळाडू जू वेनजुन आणि होऊ यिफान यांनी यापूर्वीच स्पर्धेत सहभागी होण्याचे निमंत्रण नाकारले होते. त्यांच्या नकारानंतर रिक्त झालेल्या जागेवर दिव्याला संधी मिळाली. जागतिक स्तरावर अशा मोठ्या स्पर्धेत स्थान मिळणे हे कोणत्याही खेळाडूसाठी अभिमानास्पद असते आणि दिव्यासाठी ही एक मोठी उपलब्धी आहे.

भारतीय खेळाडूंचा मोठा सहभाग

दरम्यान, या स्पर्धेत दिव्यासह एकूण 20 भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये जागतिक क्रमवारीत सध्या अग्रस्थानी असलेला आणि जागतिक विजेता डी. गुकेश हा भारतीय संघाचे नेतृत्व करेल. भारतासाठी ही एक मोठी बाब आहे की, इतक्या मोठ्या संख्येने भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होत आहेत.

दर दोन वर्षांनी होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेत जगातील 206 सर्वोत्तम खेळाडू तीन आठवडे चालणाऱ्या मिनी-मॅचेसच्या नॉकआऊट फॉरमॅटमध्ये एकमेकांसमोर उभे राहतील. या स्पर्धेतील सर्वोच्च कामगिरी करणारे पहिले तीन खेळाडू 2026 च्या 'कँडिडेट्स टूर्नामेंट'साठी पात्र ठरतील. विशेष म्हणजे, 'कँडिडेट्स टूर्नामेंट' जिंकणाऱ्या खेळाडूला जागतिक विजेत्याला आव्हान देण्याची संधी मिळते. त्यामुळे दिव्याला मिळालेली ही संधी तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरु शकते.

बुद्धिबळाच्या विश्वात भारताचा दबदबा

गेल्या काही वर्षांपासून भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळात आपला दबदबा निर्माण केला आहे. अनेक तरुण खेळाडू जागतिक स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत. दिव्या देशमुखसारख्या प्रतिभाशाली खेळाडूचा या स्पर्धेत समावेश होणे हे भारताच्या (India) बुद्धिबळ क्षेत्रातील वाढती ताकद दर्शवते. दिव्याच्या या संधीमुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि ती गोव्यात होणाऱ्या स्पर्धेत चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT