Indian team coach Manolo Marquez  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Intercontinental Cup: सीरियाने भारताची उडवली दाणादाण; प्रशिक्षक मार्केझ यांना संताप अनावर, म्हणाले...

India vs Syria Football Match: इंटरकॉन्टिनेंटल चषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि सीरीया यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत भारताला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.

Manish Jadhav

इंटरकॉन्टिनेंटल चषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि सीरीया यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत भारताला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. सीरीयाने भारतीय फुटबॉल संघाची दाणादाण उडवली. सीरीयाने भारताचा 3-0 असा पराभव केला. भारतीय फुटबॉल संघाच्या खराब प्रदर्शानंतर मुख्य प्रशिक्षक मालोलो मार्केझ चांगलेच संतापलेले दिसले. मार्केझ यावेळी म्हणाले की, मला घाबरलेले संघ आवडत नाहीत. महमूद अल अस्वाद आणि दाहेलो मोहसेन यांच्या शानदार गोलच्या जोरावर सीरियाने हा सामना खिशात घातला.

दरम्यान, सिरियाने गुणतालिकेत सहा गुणांसह आपली मोहीम संपवली. भारत आणि मॉरिशस यांचा प्रत्येकी एक गुण होता. या स्पर्धेत कोणताही अंतिम सामना नाही आणि राऊंड-रॉबिन सामन्यांनंतर सर्वाधिक गुण मिळवणारा संघ स्पर्धा जिंकतो. भारताने 2018 आणि 2023 मध्ये हे विजेतेपद पटकावले होते, तर 2019 मध्ये तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या सीरियासाठी ही पहिलीच ट्रॉफी आहे. सीरियाने भारतीय भूमीवर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले आहे.

पश्चिम आशियाई देशाचा भारतात स्पर्धा खेळण्याचा मोठा इतिहास आहे, परंतु सोमवारपूर्वी त्यांना विजेतेपद मिळाले नव्हते. 2007 आणि 2009 मध्ये नेहरु चषक फायनलमध्ये सीरियाला भारताकडून पराभव पत्करावा लागला होता, तर 2012 मध्ये या स्पर्धेत संघ चौथ्या स्थानावर राहिला होता. भारताच्या शेवटच्या दौऱ्यावर सीरियाने 2019 मध्ये इंटरकॉन्टिनेंटल कपमध्ये तिसरे स्थान पटकावले होते. यादरम्यान त्याने भारताविरुद्ध 1-1 अशी बरोबरी साधली. जानेवारीमध्ये कतार येथे झालेल्या आशियाई चषक स्पर्धेत दोन्ही संघांमधील शेवटच्या चकमकीत सीरियाने भारताचा 1-0 असा पराभव केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Manoj Bajpayee At IFFI: 'वेळेत पूर्णविराम आणि संवादात मौन हवे'; मनोज वाजपेयीने सांगितले अभिनेत्यांबाबतीत दोन टप्पे

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

IFFI 2024: इफ्फीच्या पहिल्या दिवशी ‘All We Imagine As Light’ ची चर्चा! छाया कदम, कानी कसूरती, दिव्या प्रभा यांचा सशक्त अभिनय

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

SCROLL FOR NEXT