Team India Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

IND vs ENG 3rd Test: टीम इंडियाने षटकारांच्या बाबतीत रचला इतिहास, 50 वर्ष जुना विक्रम काढला मोडीत

Team Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर सुरु असून ही मालिका सध्या रोमांचक वळणावर आहे.

Manish Jadhav

Team Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर सुरु असून ही मालिका सध्या रोमांचक वळणावर आहे. उभय संघांनी प्रत्येकी एक कसोटी जिंकली असल्यामुळे लॉर्ड्सवरील विजय दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, या कसोटी मालिकेत आतापर्यंत मोठ्या प्रमाणात धावांची बरसात झाली असून भारताने याच मालिकेत परदेशी भूमीवरील कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याचा 50 वर्षांचा जुना विक्रम मोडून इतिहास रचला आहे.

भारतीय संघाने केला नवा विक्रम

दरम्यान, 1974-75 च्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडीजने भारताविरुद्ध (India) 5 सामन्यांमध्ये एकूण 32 षटकार लगावले होते. त्यानंतर कोणत्याही संघाने परदेशी भूमीवर खेळताना कसोटी मालिकेत यापेक्षा जास्त षटकार मारले नव्हते. मात्र, भारतीय संघाने आता हा 50 वर्षांचा जुना विक्रम मोडीत काढला आहे.

इंग्लंडविरुद्ध (England) सुरु असलेल्या या कसोटी मालिकेत भारताने आतापर्यंत 36 षटकार लगावले आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने 12 षटकार मारले होते, तर दुसऱ्या कसोटीत एकूण 19 षटकार लगावले होते. लॉर्ड्समध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताने आणखी 5 षटकार जोडले. भारतीय संघाची अजून एक फलंदाजीची इनिंग शिल्लक असून या मालिकेत अजून दोन सामने बाकी आहेत. त्यामुळे षटकारांचा हा आकडा सहजपणे 50 च्या पुढे जाऊ शकतो. भारतीय संघ येणाऱ्या सामन्यांमध्येही आपल्या फलंदाजीचे दमदार प्रदर्शन दाखवेल अशी अपेक्षा आहे.

लॉर्ड्स कसोटीत दोन्ही संघांचे सारखेच गुण

लॉर्ड्स येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्या पहिल्या डावातील धावा बरोबरीत सुटल्या. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 387 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून जो रुटने शानदार शतक झळकावले, तर जेमी स्मिथ आणि ब्रायडन कार्स यांनी अर्धशतकी खेळी केली. भारताने प्रत्युत्तरात पहिल्या डावात 387 धावाच करुन इंग्लंडच्या धावसंख्येची बरोबरी साधली. भारताकडून केएल राहुलने दमदार शतक (100+) ठोकले, तर ऋषभ पंतने 74 धावा आणि रवींद्र जडेजाने 72 धावांची उत्कृष्ट खेळी केली. दरम्यान, इंग्लंडसाठी दुसऱ्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'जीवन गेला तरी चालेल, पण रील बनलीच पाहिजे', जोडप्याने कालव्यात घेतली उडी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

AI Market: अमेरिकेला मागे टाकून भारत बनणार AI ची सर्वात मोठी बाजारपेठ; चॅटजीपीटीच्या CEO चं मोठं वक्तव्य

Train Robbery: कोकण रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू लाटणारा सराईत चोरटा जेरबंद; 12.57 लाखांचा मुद्देमाल जप्त

Goa Assembly Session: मर्दनगडावर उभारण्यात येणार संभाजी महाराजांचे स्मारक, गडाच्या संरक्षणाचा मार्ग मोकळा; सरकारने दिले ठोस आश्वासन

Priyansh Arya Century: 7 चौकार, 9 षटकार! श्रेयस अय्यरच्या जोडीदाराचा धमाका, प्रियांश आर्याने ठोकले धमाकेदार शतक; नावावर केला नवा रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT