Rapid Chess Tournament Goa
पणजी: क्वीन्स चेस अँड कल्चरल क्लबतर्फे घेण्यात आलेल्या अखिल गोवा लिबरेशन कप खुल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत इंटरनॅशनल मास्टर (आयएम) नितीश बेलुरकर याने नऊही डाव जिंकून विजेतेपद पटकावले. स्पर्धा कुजिरा येथील डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय संकुलात झाली.
चैतन्य गावकर व जोशुआ तेलिस यांचे समान आठ गुण झाले. टायब्रेकर गुणांत त्यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला. आलेक्स सिक्वेरा याने साडेसात गुणांसह चौथा क्रमांक प्राप्त केला. देवेश नाईक, विहान तारी, सुधाकर पतगर, रिस कार्व्हालो, जेनिसा सिक्वेरा, हर्ष डागरे, लिया सिल्वेरा, आयुष नाईक, अर्थ कारापूरकर यांना अनुक्रमे पाचवा ते तेरावा क्रमांक मिळाला.
अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे माजी खजिनदार किशोर बांदेकर, विद्या बांदेकर, सर्वानंद शिरोडकर, संदेश प्रभू चोडणेकर, स्पर्धेचे मुख्य आर्बिटर तनिष्क कवळेकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले. क्वीन्स क्लबच्या अध्यक्ष डॉ. रुपा बेलुरकर अहवाल सादर केला. तन्वी हडकोणकर यांनी आभार मानले, तर क्लबच्या उपाध्यक्ष डॉ. प्रज्ञा काकोडकर यांनी सूत्रसंचालन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.