I League Churchill Brothers Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League: चर्चिल ब्रदर्सला करंडक प्रदान, पण विजेतेपदास पुन्हा स्थगिती; आय-लीग विजेतेपदाचा घोळ मिटेना

I League Winner Title Dispute: ‘सीएएस’च्या अपिल लवाद विभागाच्या उपाध्यक्ष यांनी आदेश दिला आहे, त्यामुळे गोव्यातील चर्चिल ब्रदर्सच्या आय-लीग विजेतेपदास स्थगिती मिळाली आहे.

Sameer Panditrao

पणजी: आय-लीग फुटबॉल स्पर्धेच्या २०२४-२५ मोसमातील विजेतेपदाचा घोळ अजूनही कायम आहे. द्वितीय स्थानी राहिलेल्या इंटर काशी संघाने दाद मागितल्यानंतर कोर्ट ऑफ आर्बिटेशन फॉर स्पोर्ट (सीएएस) यांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) अपिल्स कमिटीचा निर्णय स्थगित केला व लवाद प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आय-लीग विजेता जाहीर न करण्याचा, तसेच पदक समारंभ न घेण्याचा आदेश महासंघाला दिला.

‘सीएएस’च्या अपिल लवाद विभागाच्या उपाध्यक्ष यांनी आदेश दिला आहे, त्यामुळे गोव्यातील चर्चिल ब्रदर्सच्या आय-लीग विजेतेपदास स्थगिती मिळाली आहे, मात्र रविवारी (ता. २७) महासंघाने गोव्यात चर्चिल ब्रदर्सच्या मुख्यालयात संघाचे मुख्य आश्रयदाते चर्चिल आलेमाव, सीईओ वालंका आलेमाव, तसेच प्रशिक्षक व खेळाडूंच्या उपस्थितीत करंडक व पदके प्रदान सोहळा पार पाडला.

त्यानंतर महासंघाने अधिकृत स्पष्टीकरण देताना, ‘सीएएस’च्या आदेशाची माहिती महासंघाच्या मुख्य कार्यालयास सुट्टी असल्यामुळे गोव्यात समारंभ पूर्ण झाल्यानंतर मिळाल्याचे नमूद केले. त्याचवेळी महासंघ सर्व नियम आणि कायदेशीर प्रक्रियांचे पालन करण्यास कटिबद्ध आहे आणि आवश्यक ती योग्य कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. अपिल्स कमिटीच्या आदेशानुसार आणि ‘एआयएफएफ’ कडून दिल्ली उच्च न्यायालयात २३ एप्रिल रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनानुसार विजेतेपदाचा करंडक आणि पदके अधिकृतपणे प्रदान करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

या प्रकरणी एआयएफएफ अपिल्स कमिटीने सुनावणी घेतली आणि दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले, त्यानंतर १९ एप्रिल रोजी आदेश दिला. त्यानुसार, नामधारी एफसीने केलेले अपील ग्राह्य ठरले आणि इंटर काशीच्या खाती तीन गुणांची भर पडली नाही. त्यामुळे हा संघ ३९ गुणांसह दुसऱ्या स्थानी कायम राहिला व चर्चिल ब्रदर्सचे अग्रस्थान ४० गुणांसह अबाधित राहिले. सहा एप्रिल रोजी स्पर्धेची अखेरची फेरी संपल्यानंतर अपिल्स कमिटीचा निर्णय न झाल्यामुळे विजेता घोषित करण्यात आला नव्हता, तसेच करंडक व पदके बहाल करण्यात आली नव्हती. मात्र अखेरचा सामना खेळून गोव्यात परतल्यानंतर चर्चिल ब्रदर्स संघाने विजयी मिरवणूकही काढली होती. एआयएफएफने तिसऱ्यांदा आय-लीग विजेते घोषित केल्यामुळे पुढील मोसमातील आयएसएल स्पर्धेसाठी चर्चिल ब्रदर्सला पात्रतेची संधीही लाभली होती.

इंटर काशी संघाकडून निर्णयाचे स्वागत

इंटर काशी संघाने ‘सीएएस’कडे दाखल केलेल्या प्रकरणी (क्रमांक सीएएस २०२५-ए-११३७४) सीएएसच्या अपिल लवाद विभाग उपाध्यक्षाने जारी केलेल्या आदेशाचे स्वागत केले आहे. इंटर काशीने पत्रकात म्हटले आहे, की सीएएसच्या आदेशाद्वारे एआयएफएफच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. प्रकरणाची निष्पक्ष व स्वतंत्र सुनावणी होईल, अशी अपेक्षा इंटर काशीने व्यक्त केली आहे.

वादास कारणीभूत ठरलेला सामना

आय-लीग फुटबॉल स्पर्धेत (सामना क्रमांक ४५, तारीख १३ जानेवारी २०२५) नामधारी एफसीने इंटर काशी संघावर २-० फरकाने मात केली होती. मात्र नंतर इंटर काशी एफसीने एआयएफएफ शिस्तपालन समितीकडे नामधारी एफसीने अपात्र खेळाडू खेळविल्याची तक्रार नोंदविली. या तक्रारीनुसार, नामधारी एफसीचा क्लेडसन कार्व्हालो दा सिल्वा याला चार यलो कार्ड मिळालेली असल्यामुळे तो त्या सामन्यासाठी निलंबित असायला हवा होता, तरीही खेळला. शिस्तपालन समितीने अपात्र खेळाडू खेळविल्याबद्दल नामधारी एफसीला ०-३ फरकाने पराभूत घोषित करून इंटर काशी एफसीला ३-० विजयासह तीन गुण बहाल केले. या निर्णयाविरोधात नामधारी एफसीने अपिल्स कमिटीकडे दाद मागितली. २७ मार्च रोजी अपील समितीने अगोदरचा शिस्तपालन समितीचा निर्णय बदलला आणि इंटर काशीचे तीन गुण कमी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT