Churchill Brothers Vs Bangalore Sporting Club Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League: सामना बरोबरीत सुटल्याने चर्चिल ब्रदर्सचे नुकसान, अग्रस्थान मिळविण्याची गमावली संधी

Churchill Brothers Vs Bangalore Sporting Club: राय पंचायत मैदानावर सोमवारी दक्षिण आफ्रिकन वेड लेके याने ६१व्या मिनिटास चर्चिल ब्रदर्सला आघाडी मिळवून दिली.

Sameer Panditrao

I League Churchill Brothers Vs Bangalore Sporting Club

पणजी: घरच्या मैदानावर तळाच्या स्पोर्टिंग क्लब बंगळूरविरुद्ध विजय नोंदवून आय-लीग फुटबॉल स्पर्धेत अग्रस्थान मिळविण्याची चर्चिल ब्रदर्सला चांगली संधी होती, पण ती त्यांनी गमावली. १-१ अशा गोलबरोबरीमुळे त्यांना दोन गुणांचे नुकसान झाले आणि दुसऱ्या स्थानावर कायम राहावे लागले.

राय पंचायत मैदानावर सोमवारी दक्षिण आफ्रिकन वेड लेके याने ६१व्या मिनिटास चर्चिल ब्रदर्सला आघाडी मिळवून दिली. त्याचा हा स्पर्धेतील वैयक्तिक नववा गोल ठरला. नंतर ७२व्या मिनिटास वीस वर्षीय बचावपटू क्लॅरेन्स फर्नांडिसने शानदार गोल नोंदवून स्पोर्टिंग क्लब बंगळूरला बरोबरी साधून दिली.

चर्चिल ब्रदर्सने मिळालेल्या चांगल्या संधी साधल्या असत्या तर त्यांना पूर्ण तीन गुण मिळाले असते. त्यांची ही दुसरी बरोबरी ठरली, त्यामुळे १२ लढतीनंतर २३ गुणांसह ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. पहिल्या क्रमांकावरील नामधारी एफसी संघाच्या खाती २४ गुण आहेत.स्पोर्टिंग क्लब बंगळूरने अवे मैदानावर प्रथमच गुण मिळविला. त्यांचे आता १२ लढतीतून नऊ गुण झाले असून ते अकराव्या स्थानी आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: गोवा इतर राज्यांच्या तुलनेत खूप पुढे; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Goa ZP Election: भाजप-मगोसमोर भाटीकरांचे आव्हान? कुर्टी झेडपीसाठी ‘आप’सह काँग्रेसही रिंगणात; फोंडा पोटनिवडणुकीवर डोळा

Goa Politics: खरी कुजबुज; रवी पुत्रांचा अप्रत्यक्ष इशारा!

'मृतांमध्ये आमच्या 20 कर्मचाऱ्यांचा जीव गेला याचे दुःख'! लुथरा बंधूंनी पोलिसांसमोर मांडली बाजू; महिन्याला 25 लाख हफ्ता देत असल्याची चर्चा

Cabo De Rama Khol: ‘खोल’ टेकडीचा 2012 पासून खुलेआम विध्वंस! प्रशासन गांधारीच्‍या भूमिकेत; CRZ प्राधिकरणाच्‍या प्रकार लक्षात आणूनही दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT