Churchill Brothers Defeat Rajasthan United Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League: इंटर काशीचे स्वप्न भंगले! चर्चिल ब्रदर्सने रोखले गोलबरोबरीत; अग्रस्थानासाठी एका गुणाची गरज

Churchill Brothers Vs Inter Kashi: चर्चिल ब्रदर्सने नाट्यमय लढतीत भरपाई वेळेतील अखेरच्या मिनिटास गोल नोंदवून २-२ अशी बरोबरी साधली.

Sameer Panditrao

I League Churchill Brothers Vs Inter Kashi

पणजी: चर्चिल ब्रदर्सने नाट्यमय लढतीत भरपाई वेळेतील अखेरच्या मिनिटास गोल नोंदवून २-२ अशी बरोबरी साधली. या निकालामुळे इंटर काशी एफसीच्या विजेतेपदाच्या स्वप्नास तडा गेला, तर गोव्यातील माजी विजेत्या संघाला आय-लीग विजेतेपदासाठी अखेरच्या साखळी लढतीत बरोबरीचा एक गुण पुरेसा ठरेल.

सामन्याच्या ९०+४ व्या मिनिटास लालरेमरुआता याचा फ्रीकिकवरील फटका गोलपोस्टच्या वरच्या भागास चाटून गोलनेटमध्ये आणि चर्चिल ब्रदर्सचा घरच्या मैदानावरील पराभव टळला. चर्चिल ब्रदर्स संघाला प्रोत्साहन देण्यासाठी राय पंचायत मैदानावर फुटबॉलप्रेमींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. त्यांनी तसेच, संघाचे प्रशिक्षक दिमित्रिस दिमित्रियू व खेळाडूंनी बरोबरीच्या गोलनंतर जल्लोष केला.

त्यापूर्वी जोस लुईस मोरेनो याच्या शानदार हेडिंगमुळे चर्चिल ब्रदर्सने ५७व्या मिनिटास आघाडी प्राप्त केली होती. नंतर दोन मिनिटांत दोन गोल नोंदवून इंटर काशी एफसीने २-१ अशी आघाडी प्राप्त केली. दोन्ही वेळेस चर्चिल ब्रदर्सला गोलरक्षक सय्यद बिन अब्दुल कादीर याला जागा सोडणे महागात पडले. एडमंड लालरिनडिका याने ६३व्या मिनिटास बरोबरीचा गोल केल्यानंतर ६५व्या मिनिटास निकोला स्टोयानोविच याने कादीर जाग्यावर नसल्याची संधी साधताना दूरवरील फ्रीकिक फटक्यावर चेंडूला गोलनेटची दिशा दाखविली.

चर्चिल ब्रदर्सचे आता २१ लढतीतून ३९ गुण झाले असून इंटर काशी संघाचे ३६ गुण झाले. अखेरच्या फेरीत इंटर काशी संघाने राजस्थान युनायटेडला पराभूत केले, तरी त्यांना चर्चिल ब्रदर्सला मागे टाकणे शक्य होणार नाही. चर्चिल ब्रदर्सचा अखेरचा सामना श्रीनगर येथे रियल काश्मीर संघाविरुद्ध होईल. त्या लढतीत बरोबरीचा एक गुण मिळाल्यास गोव्यातील संघाचे ४० गुण होतील आणि त्यांना अग्रस्थानावरून खाली खेचणे कोणत्याही संघास शक्य होणार नाही. रियल काश्मीरचे ३६ गुण असून त्यांना विजेतेपदाची संधी नाही.

कोझिकोड येथे गोकुळम केरळा एफसीने श्रीनिदी डेक्कनला १-० फरकाने नमविले. त्यामुळे केरळमधील संघ विजेतेपदाच्या शर्यतीत पुढे आला. गोकुळम केरळाचे आता २१ लढतीतून ३७ गुण झाले आहेत. त्यांचा अखेरचा सामना गोव्यातील धेंपो क्लबविरुद्ध होईल. तो सामना जिंकल्यास गोकुळम केरळाचे ४० गुण होतील. रियल काश्मीरविरुद्ध चर्चिल ब्रदर्स पराभूत झाल्यास केरळमधील संघ आय-लीग स्पर्धा विजेता बनेल. चर्चिल ब्रदर्स व गोकुळम केरळाचे समान ४० गुण झाल्यास हेड-टू-हेडमध्ये गोव्यातील संघाला आय-लीग करंडक १२ वर्षांच्या खंडानंतर प्राप्त होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

SCROLL FOR NEXT