I League 2025 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League: पेनल्टी गोलमुळे स्पोर्टिंग क्लबचा पराभव! युनायटेड स्पोर्टने मारली बाजी; 'हेम्ब्रम' ठरला हिरो

Sporting Club Vs United Sports Club: तारक हेम्ब्रम याने १०व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर गोल केला. युनायटेड क्लबने ही आघाडी अखेरपर्यंत टिकवली.

गोमन्तक डिजिटल टीम

I League Sporting Club Vs United Sports Club

पणजी: सामन्याच्या पूर्वार्धात पेनल्टी गोल स्वीकारल्यामुळे आय-लीग २ फुटबॉल स्पर्धेत स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाला शनिवारी निसटता पराभव पत्करावा लागला. पश्चिम बंगालमधील कल्याणी येथे झालेल्या लढतीत युनायटेड स्पोर्टस क्लबने १-० फरकाने विजयाची नोंद केली.

तारक हेम्ब्रम याने १०व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर गोल केला. युनायटेड क्लबने ही आघाडी अखेरपर्यंत टिकवली. त्यांचा हा पाच सामन्यांतील दुसरा विजय असून सात गुण झाले आहेत. स्पोर्टिंग क्लब द गोवास दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे चार लढतीनंतर चार गुण कायम राहिले. स्पोर्टिंग क्लब गोवाचा पुढील सामना २० फेब्रुवारी एला-जुने गोवे येथे ट्राऊ एफसीविरुद्ध होईल.

चानमारी एफसी अव्वल

दरम्यान, स्पर्धेतील आणखी एका सामन्यात ऐजॉल-मिझोरामच्या चानमारी एफसीने एफसी बंगळूर युनायटेडला २-० फरकाने नमवून अग्रस्थान भक्कम केले. त्यांचा हा पाच सामन्यांतील चौथा विजय असून सर्वाधिक १३ गुण झाले आहेत. बंगळूर युनायटेडचे तिसऱ्या पराभवामुळे पाच लढतीनंतर सहा गुण कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

SCROLL FOR NEXT