Dempo SC vs Sreenidi Deccan Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I-League 2025: श्रीनिदी डेक्कनची जोरदार मुसंडी! दोन गोलच्या आघाडीनंतरही धेंपो क्लब पराभूत; ब्रँडनचा गोल ठरला निर्णायक

Dempo SC vs Sreenidi Deccan: माजी विजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबने पूर्वार्धात दोन गोलची आघाडी घेतली, तरीही आय-लीग फुटबॉल सामन्यात त्यांना पराभूत व्हावे लागले.

गोमन्तक डिजिटल टीम

Sreenidi Deccan Stuns Dempo SC with 3-2 Comeback Win in I-League 2025

पणजी: माजी विजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबने पूर्वार्धात दोन गोलची आघाडी घेतली, तरीही आय-लीग फुटबॉल सामन्यात त्यांना पराभूत व्हावे लागले. श्रीनिदी डेक्कनने जोरदार मुसंडी साधताना सामना ३-२ फरकाने निसटता जिंकला.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर मंगळवारी सामना झाला. त्रिनिदाद-टोबॅगोचा मार्कुस जोसेफ याने आठव्या मिनिटास, तर स्पॅनिश हुआन मेरा याने ४५+३व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे विश्रांतीच्या ठोक्याला समीर नाईक यांच्या मार्गदर्शनाखालील धेंपो क्लब २-० असा आघाडीवर होता. कोलंबियन खेळाडू डेव्हिड कास्तानेदा याच्या दोन गोलमुळे तासाभराच्या खेळात श्रीनिदी डेक्कनने २-२ अशी बरोबरी साधली. कास्तानेदा याने अनुक्रमे ५३ व ५९व्या मिनिटास गोल नोंदविला. नंतर ६९व्या मिनिटास ब्रँडन वनलालरेमडिका याने केलेल्या गोलमुळे हैदराबादमधील संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात हैदराबाद (Hyderabad) येथे धेंपो क्लबने श्रीनिदी डेक्कनला एका गोलने पराभूत केले होते, मात्र त्याची पुनरावृत्ती घरच्या मैदानावर होऊ शकली नाही. लागोपाठच्या दोन बरोबरीनंतर धेंपो क्लबला एकंदरीत सातव्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे १६ सामने खेळल्यानंतर त्यांचे १९ गुण व नववा क्रमांक कायम राहिला. श्रीनिदी डेक्कनचा हा सहावा विजय ठरला. त्यांचे आता १६ लढतीतून २२ गुण झाले असून ते आठव्या क्रमांकावर आहेत. धेंपो क्लबचा पुढील सामना दोन मार्च रोजी दिल्ली एफसीविरुद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "पी.अशोक गजपती राजू यांचे मी स्वागत करतो" डॉ. प्रमोद सावंत (मुख्यमंत्री)

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

SCROLL FOR NEXT