India vs Pakistan Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान संघ भारतात येणार? वर्ल्ड कपमध्ये भिडणार

Hockey Mens Junior World Cup 2025: एफआयएच हॉकी पुरुष ज्युनियर विश्वचषक भारतात होणार आहे. ही स्पर्धा तामिळनाडूमध्ये आयोजित केली जाणार आहे.

Manish Jadhav

Hockey Mens Junior World Cup 2025: एफआयएच हॉकी पुरुष ज्युनियर विश्वचषक भारतात होणार आहे. ही स्पर्धा तामिळनाडूमध्ये आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच 24 संघ सहभागी होत आहेत. त्यापैकी एक पाकिस्तानचा संघ आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडल्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानी संघ भारत दौऱ्यावर येऊ शकतो. इतकेच नाही तर या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तानला एकाच पूलमध्ये ठेवण्यात आले आहे. हॉकी पुरुष ज्युनियर विश्वचषकासाठी सर्व 24 संघांना 6 पूलमध्ये विभागण्यात आले आहे. आता अशा परिस्थितीत, पुन्हा एकदा चाहत्यांना क्रीडा क्षेत्रात भारत आणि पाकिस्तानची लढाई पाहता येईल.

हॉकी पुरुष ज्युनियर विश्वचषकाचे सहा पूल पुढीलप्रमाणे

पूल A- दक्षिण आफ्रिका, आयर्लंड, कॅनडा आणि जर्मनी

पूल B- भारत, पाकिस्तान, स्वित्झर्लंड, चिली

पूल C- न्यूझीलंड, जपान, चीन, अर्जेंटिना

पूल D- नामिबिया, स्पेन, इजिप्त, बेल्जियम

पूल E- इंग्लंड, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, मलेशिया

पूल F- ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, फ्रान्स आणि कोरिया

गेल्या हंगामात हा संघ विजेता

गेल्या वेळी जर्मनीने एफआयएच हॉकी पुरुष ज्युनियर विश्वचषक जिंकला होता. अंतिम फेरीत जर्मनीने फ्रान्सचा (France) 2-1 असा पराभव करुन विजेतेपद पटकावले होते.

हॉकी इंडियाचे सरचिटणीस काय म्हणाले?

याप्रसंगी, हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंह म्हणाले की, "आज हॉकी जगतासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे कारण आपण 24 देशांच्या सहभागासह पहिल्या एफआयएच ज्युनियर पुरुष हॉकी विश्वचषकासाठी पूल ड्रॉ पाहत आहोत. हॉकी इंडियाच्या वतीने मी भारताचे (India) माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशभरातील हॉकी आणि त्याच्या खेळाडूंना दिलेल्या पाठिंब्याबद्दल मनापासून आभार मानतो."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT