Hardik Pandya Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

Hardik Pandya Fastest Fifty: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या आणि पाचव्या सामन्यात विस्फोटक फलंदाजी केली.

Manish Jadhav

Hardik Pandya Record: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने धावांचा डोंगर उभारला. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी भारतीय संघाला धडाकेबाज सुरुवात करुन दिली. त्यानंतर तिलक आणि हार्दिक जोडीने आफ्रिकेच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. दोघांनी आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यातही आष्टपैलू हार्दिक पांड्याने अवघ्या 16 चेंडूंत तूफानी अर्धशतक पूर्ण करत इतिहास रचला.

हार्दिकच्या या झंझावाती खेळीच्या जोरावर भारतीय संघाने सामन्यावर मजबूत पकड मिळवलीच, पण त्याचसोबत हार्दिकने अनेक दिग्गजांना मागे टाकत विक्रमांच्या यादीत आपले स्थान उंचावले. भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हार्दिक आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. त्याने आपल्या या खेळीने स्टेडियममधील हजारो चाहत्यांना मंत्रमुग्ध केले.

हार्दिक पांड्याने जेव्हा मैदानात पाऊल ठेवले, तेव्हापासूनच त्याचे इरादे स्पष्ट दिसत होते. त्याने आपल्या खेळीची सुरुवातच एका उत्तुंग षटकाराने केली, ज्यावरुन तो आज मोठ्या खेळीच्या मूडमध्ये असल्याचे स्पष्ट झाले. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी त्याला रोखण्यासाठी विविध रणनीती आखल्या, परंतु हार्दिकच्या आक्रमकतेपुढे त्या सर्व फोल ठरल्या. विशेषतः दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू लिंडे याच्या एका षटकात हार्दिकने दोन चौकार आणि दोन षटकार ठोकून धावांचा पाऊस पाडला. हार्दिकने मैदानावर ज्या ताकदीने चेंडू सीमापार धाडले, ते पाहून प्रतिस्पर्धी संघ पूर्णपणे हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. त्याने डावाच्या 17व्या षटकात एक जबरदस्त षटकार खेचला आणि अवघ्या 16 चेंडूंत आपली पन्नाशी पूर्ण केली.

भारतासाठी सर्वात वेगवान टी-20 अर्धशतक झळकावण्याचा विक्रम आजही दिग्गज फलंदाज युवराज सिंह याच्या नावावर अबाधित आहे. युवराजने 2007 च्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध डरबन येथे अवघ्या 12 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकून विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. त्यानंतर तब्बल 18 वर्षांनी हार्दिक पांड्याने 16 चेंडूंत अर्धशतक झळकावून या यादीत दुसरे स्थान पटकावले. यापूर्वी, 2025 मध्येच युवा फलंदाज अभिषेक शर्माने इंग्लंडविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर 17 चेंडूंत अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. आता हार्दिक तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. या गौरवशाली यादीत केएल राहुल 18 चेंडूंसह चौथ्या क्रमांकावर आहे.

हार्दिक पांड्याची ही खेळी केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नसून, ती त्याच्या आत्मविश्वासाचे प्रतीक मानली जात आहे. गेल्या काही काळापासून हार्दिकच्या फॉर्मबद्दल आणि तंदुरुस्तीबद्दल अनेक चर्चा रंगत होत्या, परंतु या सामन्यात त्याने आपल्या टीकाकारांना बॅटने चोख उत्तर दिले. अहमदाबादच्या खेळपट्टीवर जिथे सुरुवातीला फलंदाजांना संघर्ष करावा लागत होता, तिथे हार्दिकने दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजीवर अधिराज्य गाजवले. त्याच्या या वेगवान खेळीमुळे भारतीय धावसंख्येला मोठी गती मिळाली आणि संघाने एक आव्हानात्मक धावसंख्या उभारली. हार्दिकची ही 'विंटेज' खेळी पाहून भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या विक्रमी कामगिरीनंतर हार्दिक पांड्यावर सोशल मीडियावरुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये हार्दिकसारख्या 'फिनिशर'ची भूमिका भारतीय संघासाठी किती महत्त्वाची आहे, हे या खेळीने पुन्हा एकदा सिद्ध केले. सामन्याच्या उत्तरार्धात कमी चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याची त्याची क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेतील हा सामना हार्दिक पांड्याच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय सामन्यांपैकी एक ठरला. आगामी मोठ्या स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर हार्दिकचा हा फॉर्म भारतीय संघासाठी खूपच दिलासादायक आणि उत्साहवर्धक मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Municipal Election: विजयोत्सवाने राजधानी दुमदुमली! सलग 7 तास मिरवणूक; बाबूश पॅनेलवर शुभेच्छांचा वर्षाव VIDEO

Rashi Bhavishya: पैसा खुळखुळणार! 'या' राशींना होणार आर्थिक लाभ, बाकीच्यांचे काय? वाचा संपूर्ण राशिभविष्य..

Goa Land Grabbing Case: गोव्यातील भू-माफियांना ईडीचा दणका! बनावट कागदपत्रे बनवून जमीन हडपणाऱ्यांची 6.27 कोटींची मालमत्ता जप्त

Viral Video: रील बनवणाऱ्या मॉडेलचा तमाशा! भररस्त्यात एकाला झोडपलं, सोशल मीडियावर उठली टीकेची झोड; काय घडलं नेमकं?

Iran US Israel War: ''इराण कधीही सरेंडर करु शकतो'', डोनाल्ड ट्रम्प यांचा G7 बैठकीत मोठा दावा; मध्यपूर्वेतील युद्धाला नवं वळण

SCROLL FOR NEXT