Cricket|Clean Bowled Canva
गोंयचें खेळामळ

Women's T20 Cricket: दिखामदार सुरुवात करणाऱ्या गोव्यानं शेवटी खाल्ल्या गटांगळ्या; सलग चौथ्या पराभवासह केली मोहिमेची सांगता!

Gujarat Defeated Goa: सीनियर महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेत सुरवातीचे तीन सामने जिंकून गोव्याने दिमाखदार वाटचाल केली, मात्र नंतर सलग चार पराभवांसह मोहिमेची निराशाजनक सांगता झाली.

Manish Jadhav

पणजी: सीनियर महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेत सुरवातीचे तीन सामने जिंकून गोव्याने दिमाखदार वाटचाल केली, मात्र नंतर सलग चार पराभवांसह मोहिमेची निराशाजनक सांगता झाली. सोमवारी बडोदा येथे अ गटातील अखेरच्या साखळी सामन्यात गुजरातने गोव्याला सहा विकेट राखून पराभूत केले.

दरम्यान, पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या गोव्याची एकवेळ 6 बाद 24 धावा अशी दारुण स्थिती होती. तरन्नुम पठाण (नाबाद 39) व दिव्या नाईक (31) यांनी सातव्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केल्यामुळे गोव्याला आव्हान उभारता आले. गुजरातने अखेरचे पाच चेंडू शिल्लक राखून आणि चार विकेट गमावून विजय नोंदवला. गोव्याने (Goa) तीन सामने जिंकले, तर चार पराभव पत्करले, त्यामुळे त्यांच्या खाती12 गुण जमा झाले. त्यांना आठ संघांत पाचवा क्रमांक मिळाला. आंध्रला पहिला, मुंबईला दुसरा, तमिळनाडूस तिसरा, ओडिशाला चौथा क्रमांक मिळाला.

संक्षिप्त धावफलक

गोवा: 20 षटकांत 7 बाद 95 (संजुला नाईक 5, श्रेया परब 2, पूर्वजा वेर्लेकर 6, तरन्नुम पठाण नाबाद 39, प्रीती यादव 0, पूर्वा भाईडकर 1, तेजस्विनी दुर्गड 5, दिव्या नाईक 31, तनया नाईक नाबाद 2, कृतिकाबेन 4-1-13-3, जयाबेन रामू 4-0-16-2) पराभूत वि. गुजरात: 19.1 षटकांत 4 बाद 99 (एस. राऊत 21, भावना गोपलानी नाबाद 39, पूर्वा भाईडकर 3-0-10-1, प्रीती यादव 4-0-24-1, तरन्नुम पठाण 4-0-18-2, सुनंदा येत्रेकर 2.1-0-16-0, श्रेया परब 4-0-17-0, तनया नाईक 2-0-11-0).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT