Ameya Audi Goa X
गोंयचें खेळामळ

Ameya Audi: अमेय अवदीचा युरोपात डंका! चेस्के बुदयोव्हिस स्पर्धेत विजेता, फ्रान्समध्ये तृतीय क्रमांक

Ameya Audi Goa Chess: अमेय याला चेस्के बुदयोव्हिस स्पर्धेत चौथे मानांकन होते. दहा फेऱ्यांतून त्याने साडेसात गुणांसह विजेतेपद पटकावले. त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूंपेक्षा दीड गुण जास्त नोंदविला.

Sameer Panditrao

पणजी: गोमंतकीय इंटरनॅशनल मास्टर (आयएम) अमेय अवदी याच्यासाठी युरोप बुद्धिबळ दौरा यशस्वी ठरला. त्याने चेक प्रजासत्ताकातील चेस्के बुदयोव्हिस आयएम स्पर्धेत त्याने विजेतेपद पटकावले, तर याच देशातील टेप्लिस ओपन ‘ए’ स्पर्धेत तो आठव्या क्रमांकासह बक्षीस प्राप्त खेळाडू ठरला. फ्रान्समधील व्हॉजॅनी ओपन स्पर्धेत त्याला तृतीय क्रमांक मिळाला.

अमेय याला चेस्के बुदयोव्हिस स्पर्धेत चौथे मानांकन होते. दहा फेऱ्यांतून त्याने साडेसात गुणांसह विजेतेपद पटकावले. त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूंपेक्षा दीड गुण जास्त नोंदविला. ऑस्ट्रियन फिडे मास्टर निको माराकोव्हिट्स याला सहा गुणांसह दुसरा, तर भारतीय फिडे मास्टर अपूर्व कांबळे याला साडेपाच गुणांसह तिसरा क्रमांक मिळाला.

अमेयने या स्पर्धेत चेक ग्रँडमास्टर रासिक वितेस्लाव, फिडे मास्टर ब्रुनो टॉप्नसिक, फिडे मास्टर डेव्हिड हाक, सायमन लँग, जेडन ली यांच्यावर मात केली. ग्रँडमास्टर पेत्र हाबा, कँडिडेट मास्टर याकुब ओसेलाक, निको माराकोव्हिट्स यांच्याविरुद्ध अमेयला बरोबरीचा अर्धा गुण मिळाला. यापूर्वी या स्पर्धेत त्याने २०२३ मध्ये ‘ओपन ए’ विभागात विजेतेपद मिळविले होते, तर २०२४ मध्ये तो संयुक्त अव्वल (टायब्रेकर गुणांत उपविजेता) ठरला होता.

चेक प्रजासत्ताकातील टेप्लिस ओपन ‘ए’ स्पर्धेत अमेय याने साडेसहा गुणांची नोंद केली. एकंदरीत तो संयुक्त दुसरा होता, मात्र टायब्रेकरमध्ये त्याला आठव्या क्रमांकांचे बक्षीस मिळाले. चेक प्रजासत्ताकाचा आयएम वाक्लाव्ह फिनेक व भारतीय आयएम सात्विक अडिगा यांचे समान साडेसात गुण झाले. टायब्रेकरमध्ये त्यांना अनुक्रमे विजेते व उपविजेतेपद मिळाले. या स्पर्धेत २८ देशांतील दीडशे बुद्धिबळपटू खेळले, त्यात ६१ खेळाडू किताबधारक होते.

भारतीय बुद्धिबळपटूंचे वर्चस्व

फ्रान्समधील व्हॉजॅनी ओपन बुद्धिबळ स्पर्धेत अमेयला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले. या स्पर्धेतील नऊ फेऱ्यांत त्याने साडेसहा गुण नोंदविले. मातब्बर बुद्धिबळपटूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेत पहिले तिन्ही क्रमांक भारतीय बुद्धिबळपटूंना मिळाले. आयएम महंमद नुबेरशाह सात गुणांसह विजेता ठरला. आयएम अनुज श्रीवर्ती व अमेय यांचे समान साडेसहा गुण झाल्यानंतर टायब्रेकरमध्ये त्यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला. प्रमुख खेळाडूंत अमेयने अव्वल मानांकित ग्रँडमास्टर हिचाम हमदौची, आयएम अनुज श्रीवर्ती, फिडे मास्टर व्हर्जिल ब्रेयूल यांना बरोबरीत रोखले, तर आयएम सर्जिओ एस्टेरेमेरा, आयएम लुकास डी निकोलान्तियोनियो, रॉजर लब्रुयेरे, विल्यम गॉर्द, तिमोथे मारेयूआ यांच्यावर मात केले. या स्पर्धेत १३ देशांतील ५३ बुद्धिबळपटू सहभागी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

SCROLL FOR NEXT