Goa women's cricket team wins second consecutive match Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Cricket: गोव्याच्या महिला संघाचा सलग दुसरा विजय! चंडीगडला 43 धावांनी धूळ चारली

Goa vs Chandigarh women's cricket match: गोव्याच्या महिला क्रिकेट संघाने सीनियर टी-२० स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना चंडीगडवर ४३ धावांनी दणदणीत विजय मिळविला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्याच्या महिला क्रिकेट संघाने सीनियर टी-२० स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना चंडीगडवर ४३ धावांनी दणदणीत विजय मिळविला. अवघ्या १३ धावांत ३ गडी बाद केलेली श्रेया परब सामन्याची मानकरी ठरली.

स्पर्धेच्या एलिट अ गटातील सामना मंगळवारी प्रकाशझोतात गुजरातमधील सूरत येथील लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमवर झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गोव्याच्या महिला संघाने ५ बाद १५४ धावा केल्या. नंतर नियंत्रित गोलंदाजीच्या बळावर चंडीगडला ९ बाद १११ धावांत रोखले. श्रेयाव्यतिरिक्त पूर्वा भाईडकर हिने दोन गडी बाद केले. स्पर्धेतील पहिल्या लढतीत गोव्याने सोमवारी जम्मू-काश्मीरला ३८ धावांनी पराभूत केले होते. त्यांचा पुढील सामना २९ रोजी कर्नाटकविरुद्ध होईल.

गोव्याच्या डावात हर्षिता यादव व पूर्वजा वेर्लेकर यांनी ५८ धावांची दमदार सलामी दिली. हर्षिताने तेजस्विनी दुर्गड हिच्यासमवेत दुसऱ्या विकेटासठी ३१ धावा जोडल्या. शिखा पांडे व विनवी गुरव यांनी चौथ्या विकेटसाठी केलेल्या ४५ धावांची भागीदारी केल्यानंतर विनवीने कर्णधार सुनंदा येत्रेकरसह गोव्याला दीडशतक गाठून दिले. गटात आता प्रत्येकी दोन सामने खेळल्यानंतर गोवा, कर्नाटक व छत्तीसगडचे प्रत्येकी आठ गुण झाले आहेत. चांगल्या धावसरासरीमुळे गोव्याचा महिला संघ एलिट अ गटात अग्रस्थानी आहे.

संक्षिप्त धावफलक

गोवा : २० षटकांत ५ बाद १५४ (हर्षिता यादव ४५, पूर्वजा वेर्लेकर २५, तेजस्विनी दुर्गड १९, शिखा पांडे १८, विनवी गुरव नाबाद ३१, पूर्वा भाईडकर १, सुनंदा येत्रेकर नाबाद १४, कुमारी शिबी ४-०-२६-५) वि. वि. चंडीगड : २० षटकांत ९ बाद १११ (मोनिका पांडे १७, सारा कुमार १६, आराधना बिश्त २१, शिखा पांडे ४-०-१९-१, मेताली गवंडर १-०-१२-१, पूर्वा भाईडकर ४-०-१६-२, सुनंदा येत्रेकर ४-०-२८-१, श्रेया परब ४-०-१३-३, तेजस्विनी दुर्गड २-०-१५-०, तनया नाईक १-०-७-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nigeria Crime: जीव वाचवण्यासाठी लोकांनी नदीत घेतल्या उड्या, बंदूकधाऱ्यांचा हैदोस! नायजेरियातील भीषण हल्ल्यात 62 जणांचा मृत्यू; हजारो बेघर

Goa Agriculture: डिचोलीत भातकापणीला वेग; अवकाळी पावसामुळे यंदा उत्पादनात 50 टक्के घट होण्याची शक्यता

Neeraj Yadav Demise: भारतानं गमावला हिरा! तीन वेळचा पॅरा आशियाई सुवर्णपदक विजेता नीरज यादवचं निधन; विष प्राशन करुन संपवलं जीवन

POCSO Case Quashed: पॉक्सो गुन्हा आणि आरोपपत्र रद्द; याचिकाकर्ता व पीडित कुटुंबीयांना 3 लाखांचा दंड

Goa Vehicle Sales: गोव्यात दसऱ्याला वाहन खरेदीचा वेग मंदावला! नोंदणीत तब्बल 37.70 टक्क्यांची घट

SCROLL FOR NEXT