Vinod Phadke Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Board of Veterans Cricket: व्हेटरन क्रिकेट सचिवपदी गोव्याचे विनोद फडके

Vinod Phadke: बीव्हीसीआय प्रभारी अध्यक्ष त्यागी यांच्या अध्यक्षतेखाली आमसभेत फडके यांच्या सचिवपदी शिक्कामोर्तब झाले

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : गोव्याचे विनोद फडके यांची भारतीय व्हेटरन क्रिकेट मंडळाच्या (बीव्हीसीआय) सचिवपदी निवड झाली. शुक्रवारी रात्री मंडळाची वार्षिक आमसभा वागातोर येथे झाली.

बीव्हीसीआय प्रभारी अध्यक्ष प्रवीण त्यागी यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा झाली. यावेळी फडके यांच्या सचिवपदी नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले, तसेच महाराष्ट्राच्या सुधीर कुलकर्णी यांच्याकडे वरिष्ठ उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. मंडळाच्या इतर पदाधिकाऱ्यांत केरळचे सेनन नायर खजिनदार, मुंबईचे मयांक खंडेवाल संयुक्त सचिव आहेत. गोव्याचे सुदेश प्रभुदेसाई यांना मंडळाचे सदस्य या नात्याने सामावून घेण्यात आले.

आमसभेत २०२४-२५ मोसमाच्या वेळापत्रकावर चर्चा झाली. २०२५ मधील इंडियन व्हेटरन्स प्रीमियर लीग (आयव्हीपीएल) स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात घेण्याचे ठरले. या वर्षी सहा संघांची पहिली आयव्हीपीएल यशस्वीपणे घेतल्याबद्दल प्रवीण त्यागी यांचे अभिनंदन करण्यात आले. जानेवारी २०२५ मध्ये राष्ट्रीय व्हेटरन्स क्रिकेट स्पर्धा मध्य प्रदेशमध्ये घेण्यात येईल, तर त्यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये विभागीय स्पर्धा होईल. तीन देशांची व्हेटरन्स क्रिकेट स्पर्धा घेण्याचेही आमसभेत ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT