Goa Cricket News Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Ranji Cricket: गोव्याचा रणजी संघ जाहीर! नवीन चेहऱ्यांचा समावेश; प्रतिक्षा यादीत आहेत 'हे' खेळाडू

Goa Cricket Team: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या रणजी निवड समितीने सोळा सदस्यीय संघ जाहीर केला. अनुभवी दर्शन मिसाळ कर्णधारपदी कायम आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कर्नाटकातील पाहुणा क्रिकेटपटू के. व्ही. सिद्धार्थ याने गतमोसमात यष्टिरक्षणास प्राधान्य दिल्यामुळे स्थानिक समर दुभाषी याला फक्त दोनच रणजी करंडक क्रिकेट सामने खेळता आले. यंदा प्लेट गटातील मणिपूरविरुद्धच्या पहिल्या लढतीसाठी या २९ वर्षीय यष्टिरक्षकास निवड समितीने पहिली पसंती दिली.

गोवा आणि मणिपूर यांच्यातील मोसमातील पहिला रणजी करंडक प्लेट गट चार दिवसीय सामना शुक्रवारपासून (ता. ११) पर्वरी येथे खेळला जाईल. त्या लढतीसाठी गोवा क्रिकेट असोसिएशनच्या रणजी निवड समितीने सोळा सदस्यीय संघ जाहीर केला. अनुभवी दर्शन मिसाळ कर्णधारपदी कायम आहे.

भारतीय रेल्वेच्या सेवेत रुजू झाल्यामुळे गतमोसमात २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धेत रेल्वे संघातून खेळलेला वेगवान गोलंदाज ऋत्विक नाईक गोव्याच्या रणजी संघात परतला आहे. मध्यफळीतील फलंदाज कश्यप बखले यालाही संधी मिळाली.

अष्टपैलू राहुल मेहता व फिरकी गोलंदाज कीथ पिंटो हे निवडलेल्या संघातील नवे चेहरे आहेत. गोव्याच्या झटपट क्रिकेट संघातून खेळलेला वेगवान शुमम तारी यालाही चार दिवसीय सामन्यासाठी निवडण्यात आले.

गतमोसमातील रणजी मोसमात खेळलेल्या फेलिक्स आलेमाव, लक्षय गर्ग व विजेश प्रभुदेसाई या अनुभवी वेगवान त्रयीची निवड झालेली नाही. सलामीचा फलंदाज ईशान गडेकरही संघाबाहेर राहिला.

अभिनव प्रतीक्षा यादीत

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या गतमहिन्यातील मोसमपूर्व स्पर्धेत गोव्यातर्फे पाच डावात ६४.२ च्या सरासरीने एक शतक व दोन अर्धशतकांसह मूळ दिल्लीच्या अभिनव तेजराणा याने ३२१ धावा केल्या होत्या. मणिपूरविरुद्धच्या रणजी संघ निवडीत या डावखुऱ्या फलंदाजास प्रतीक्षा यादीत राहावे लागले. तिसऱ्या क्रमांकासाठी स्थानिक गुणवत्तेला प्राधान्य देताना मंथन खुटकर याला प्राधान्यक्रम मिळाला.

गोव्याचा संघ

सुयश प्रभुदेसाई, रोहन कदम, मंथन खुटकर, स्नेहल कवठणकर, के. व्ही. सिद्धार्थ, कश्यप बखले, समर दुभाषी (यष्टिरक्षक), दर्शन मिसाळ (कर्णधार), मोहित रेडकर, अर्जुन तेंडुलकर, हेरंब परब, शुभम तारी, ऋत्विक नाईक, दीपराज गावकर, राहुल मेहता, कीथ पिंटो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT