Goa Cricket News Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघात होणार 'मोठा बदल'! नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी; आगामी सामन्यांच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

Goa Cricket Team: गोव्याचा एलिट अ गटातील चौथा सामना २३ जानेवारीपासून सांगे येथे बडोद्याविरुद्ध होईल. त्यानंतर याच ठिकाणी ३० जानेवारीपासून पंजाबविरुद्ध चार दिवसीय सामना खेळला जाईल.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्याच्या २३ वर्षांखालील क्रिकेट संघाच्या बाकी लढतीत १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक स्पर्धेत सफल ठरलेल्या नवोदितांना संधी देण्याचे गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) ठरविले आहे. कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धेतील मोहिमेत चार लढती बाकी आहेत.

गोव्याचा एलिट अ गटातील चौथा सामना २३ जानेवारीपासून सांगे येथे बडोद्याविरुद्ध होईल. त्यानंतर याच ठिकाणी ३० जानेवारीपासून पंजाबविरुद्ध चार दिवसीय सामना खेळला जाईल. गटातील अखेरचे दोन्ही सामने गोव्याचा संघ अवे मैदानावर खेळेल.

६ फेब्रुवारीपासून त्रिवेंद्रम येथे केरळविरुद्ध, तर १३ फेब्रुवारीपासून जम्मू येथे जम्मू-काश्मीरविरुद्ध सामना खेळला जाईल. सध्या गोव्याचे तीन सामन्यांतून १४ गुण झाले असून एक अनिर्णित, एक पराभव व एक रद्द निकाल अशी कामगिरी आहे.

बडोदाविरुद्धच्या सामन्यासाठी १९ वर्षांखालील संघातील काही खेळाडूंना संधी मिळेल. त्यादृष्टीने संघ निवड समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. फलंदाजी आणि गोलंदाजीत नव्या चेहऱ्यांना सामावून घेतले जाईल.

१९ वर्षांखालील वयोगटातील संघाची चार दिवसीय, तसेच एकदिवसीय स्पर्धेतील मोहीम संपली असून या वयोगटातील काही खेळाडूंची आता २३ वर्षांखालील वयोगटात चाचपणी होईल. गोव्याने कुचबिहार करंडक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. या लढतीत त्यांना मध्य प्रदेशने डावाने पराभूत केले होते.

कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत गोव्याचा संघ तीन सामने खेळला. झारखंडविरुद्ध जमशेदपूर येथे त्यांना डाव व ११३ धावांनी पराभव पत्करावा लागला. पणजी जिमखान्यावरील गुजरातविरुद्धचा सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द झाला, तर मेघालयाविरुद्ध शिलाँग येथील सामना अनिर्णित राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेह पेटीत जाळला, राख नदीत फेकली; हत्येच्या 8 दिवसांनंतर सत्य आलं समोर

Casaulim: ..आणखीन एक खळबळजनक घटना! शेतात आढळली मानवी कवटी; कासावली परिसरात भीतीचे वातावरण

Goa Drowning Death: 96 जण समुद्रात बुडाले, 2654 जणांना जीवनदान; गोव्यात 5 वर्षात झालेल्या दुर्घटनांचा Report

Goa Latest Updates: रेल्वे रुळावर महिलेचा मृतदेह आढळला

VIDEO: साळगावमध्ये 'रेंट-ए-बाईक' वादातून राडा, टोळक्याकडून पिता-पुत्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण; जीवे मारण्याची दिली धमकी

SCROLL FOR NEXT