Goa Under 19 Cricket Team Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Under 19 Cricket Team: गोव्याच्या युवा संघाचा रोमहर्षक विजय, कमी धावसंख्येच्या सामन्यात हिमाचलला दोन विकेटने नमविले

Goa vs Himachal Under 19: गोव्याच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने पुदुचेरी येथील स्पर्धेत शुक्रवारी रोमहर्षक विजय नोंदविला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्याच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने पुदुचेरी येथील स्पर्धेत शुक्रवारी रोमहर्षक विजय नोंदविला. कमी धावसंख्येच्या लढतीत त्यांनी हिमाचल प्रदेशला दोन विकेट राखून नमविले.

पुदुचेरी क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षांखालील आंतरराज्य एकदिवसीय करंडक स्पर्धेत गोव्याचा ही तीन सामन्यांतील दुसरा विजय ठरला. हिमाचल प्रदेशचा डाव ९५ धावांत गुंडाळल्यानंतर गोव्याची आठ बाद ६२ अशी घसरगुंडी उडाली होती.

आठव्या क्रमांकावरील मिहीर कुडाळकर याने ३७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करताना संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी ठरलेल्या मिहीर याने २५ चेंडूंतील खेळीत एक चौकार व पाच षटकार मारले.

त्यापूर्वी, डावखुरा गोविंद सावळ (३-३९) व वेदांत डब्राल (४-४९) या वेगवान गोलंदाजांनी, तसेच ऑफस्पिनर मिहीर कुडाळकर (३-७) यांनी हिमाचल प्रदेशला शंभर धावांच्या आत गारद करण्यात मोलाचा वाटा उचलला.

संक्षिप्त धावफलक

हिमाचल प्रदेश ः १९.४ षटकांत सर्वबाद ९५ (जपनीत सिंग १७, गोविंद सावळ ७.४-१-३९-३, वेदांत डब्राल ८-०-४९-४, मिहीर कुडाळकर ४-२-७-३) पराभूत वि. गोवा ः १९ षटकांत ८ बाद ९६ (आदित्य कोटा १२, विनीत कामत ३, आफ्रिदसाब राजक्कनावर १, आराध्य गोयल ४, मोहित यादव १७, वेदांत डब्राल ७, विस्मय फळगावकर ४, मिहीर कुडाळकर नाबाद ३७, गोविंद सावळ ०, जय कांगुरी नाबाद १, अंश धिमन २-१५, नौनीहाल ४-३६).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT