गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अहमदाबाद येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील अखिल भारतीय निमंत्रित संघांच्या मोसमपूर्व क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा संघ खेळणार आहे. सामने तीन दिवसीय असून गोवा क्रिकेट असोसिएशनने संघ जाहीर केला.
पुंडलिक नाईक स्पर्धेसाठी जाणाऱ्या वीस सदस्यीय संघाचे नेतृत्व करेल. स्पर्धेला २४ ऑगस्टपासून सुरवात होईल. गोव्याचा अ गटात समावेश असून गुजरात-१, सौराष्ट्र, आंध्र प्रदेश हे गटातील अन्य संघ आहेत. गोव्याचा पहिला सामना आंध्र प्रदेशविरुद्ध २४ ते २६ ऑगस्ट या कालावधीत खेळला जाईल. त्यानंतर २८ ते ३० ऑगस्ट या कालावधीत सौराष्ट्रविरुद्ध, तर अखेरचा साखळी सामना १ ते ३ सप्टेंबर या कालावधीत गुजरात-१ संघाविरुद्ध होईल.
संघ: शंतनू नेवगी, दिशांक मिस्कीन, यश कसवणकर, दर्पण पागी, निसर्ग नागवेकर, विराज नाईक, जीवनकुमार चित्तेम, पुंडलिक नाईक (कर्णधार), समर्थ राणे, शमिक कामत, चिगुरपती व्यंकट, मिहीर कुडाळकर, शिवेन बोरकर, ओम खांडोळकर, आराध्य गोयल, आदित्य कोटा, द्विज पालयेकर, अनुज यादव, निश्चय नाईक, ईशान होडारकर.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.