U19 Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

U19 Cricket: पहिल्या डावात 63 धावांची आघाडी, दुसऱ्या डावात गोव्याची घसरगुंडी; ओडिशासमोर 194 धावांचे लक्ष्य

Goa vs Odisha U19 Cricket: सामना ओडिशातील बालनगीर येथील गांधी स्टेडियमवर सुरू आहे. चौथ्या दिवशी यजमान संघासमोर विजयासाठी १९४ धावांचे आव्हान आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात गोव्याने पहिल्या डावात ओडिशावर ६३ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी प्राप्त केली, पण दुसऱ्या डावात त्यांची घसरगुंडी उडाल्यामुळे सामन्याच्या अखेरच्या चौथ्या दिवशीचा खेळ रविवारी रंगतदार ठरेल.

सामना ओडिशातील बालनगीर येथील गांधी स्टेडियमवर सुरू आहे. चौथ्या दिवशी यजमान संघासमोर विजयासाठी १९४ धावांचे आव्हान आहे. गोव्याची मदार त्यांच्या गोलंदाजांवर असेल. गोव्याने पहिल्या डावात २५० धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसअखेरच्या ४ बाद १२२ धावांवरून शनिवारी ओडिशाचा पहिला डाव १८७ धावांत संपुष्टात आल्यामुळे गोव्याला आघाडी मिळाली. मात्र दुसऱ्या डावात गोव्याचा संघ १२९ धावांतच गारद झाल्यामुळे त्यांच्यापाशी आता १९३ धावांची आघाडी जमा झाली आहे.

संक्षिप्त धावफलक गोवा, पहिला डाव : २५०

ओडिशा, पहिला डाव (४ बाद १२२ वरून) : ९४ षटकांत सर्वबाद १८७ (आदित्य आनंद ४०, जोगेश्वर बाग २९, चिगुरुपती व्यंकट २५-१२-२९-४, शमीक कामत २२-७-४९-३, मिहीर कुडाळकर २०-६-४२-१, समर्थ राणे १९-६-३७-२, मोहित यादव १-०-८-०, आदित्य कोटा ४-०-१४-०, आफ्रिद राजाक्कनावार ३-१-३-०).

गोवा, दुसरा डाव : ४३.३ षटकांत सर्वबाद १२९ (आदित्य कोटा २२, विनीत कामत ०, बरहान दाश ४, आराध्य गोएल १७, आफ्रिद राजाक्कनावार १६, साई नाईक १४, मोहित यादव ४१, चिगुरुपती व्यंकट १०, मिहीर कुडाळकर २, शमीक कामत ०, समर्थ राणे नाबाद ०, कमलेश पात्रा ३-४४, जगदीश मोहापात्रा २-२८, राझ यादव ३-६).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Super League: एफसी गोवासमोर केरळा ब्लास्टर्सचे आव्हान

Kapil Dev Statement on Mohammed Siraj: 'सिराजसाठी वाईट वाटतंय...' कपिल देव यांची रोखठोक प्रतिक्रिया; टीम इंडियाच्या निवडीवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह, न्यूझीलंडच्या माजी कर्णधारानेही निवडकर्त्यांना सुनावलं

Postwar Europe Women Persecution: नाझींचा पराभव झाला, पण महिलांचा छळ थांबला नाही; युद्धोत्तर युरोपचा काळा इतिहास

Stunt Viral Video: अंगावर काटा आणणारी स्टंटबाजी! धावत्या बाइकच्या सीटवर उभं राहून तरुणाचं रील शूट, मागून येत होता ट्रक; थरारक व्हिडिओ व्हायरल

Goa Politics: बहुजन मतांचे राजकीय गणित, पण सत्तेतील वाटा किती? गोव्यातील पंधरा वर्षांचा आढावा

SCROLL FOR NEXT