Babu Gaonkar, Harichandra Velip, and Suraj Nomee Velip Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

National Games: 38व्या राष्ट्रीय स्पर्धेत गोमंतकीय धुरंधरांचा जलवा; गोव्याने मॉडर्न पेंटाथलॉनमध्ये आणखी एका रौप्यपदकाला घातली गवसणी

Modern Pentathlon: उत्तराखंड येथे सुरु असलेल्या 38 व्या राष्ट्रीय स्पर्धेत गोव्याचे धुरंधर आपला जलवा दाखवून देत आहेत. गोव्याने मॉडर्न पेंटाथलॉनमध्ये आणखी एका रौप्यपदकाला गवसणी घातली.

Manish Jadhav

38th National Games: उत्तराखंड येथे सुरु असलेल्या 38 व्या राष्ट्रीय स्पर्धेत गोव्याचे धुरंधर आपला जलवा दाखवून देत आहेत. गोव्याने मॉडर्न पेंटाथलॉनमध्ये आणखी एका रौप्यपदकाला गवसणी घातली. बाबू गावकर, हरिचंद्र वेळीप आणि सुरज वेळीप यांचा समावेश असलेल्या या गोव्याच्या संघाने शानदार कामगिरी केली. मॉडर्न पेंटाथलॉनच्या टेट्राथलॉन पुरुष सांघिक प्रकारात 2835 गुणांसह रौप्यपदक जिंकले.

गोव्याचे हे मॉडर्न पेंटाथलॉनमधील सातवे पदक असून बाबू गावकरचे एकूण चौथे रौप्यपदक आहे. गोव्याच्या या चमूने शेवटपर्यंत निकराचा लढा दिला. परंतु त्यांना सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. गोमंतकीय खेळाडू 38 व्या राष्ट्रीय स्पर्धेत आपला ठसा उमटवत आहेत. दोन वर्षांपूर्वी गोव्यात झालेल्या 37 व्या स्पर्धेत याच खेळात राज्याला एका सुवर्णासह आठ पदके मिळाली होती.

बाबू गावकर ठरला विक्रमी पदकवीर

मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये हुकमी ॲथलीट बाबू गावकर आता राज्यातर्फे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात ‘विक्रमी’ पदकवीर ठरला आहे. दोन स्पर्धांत मिळून त्याने एकूण पाच पदके (1 सुवर्ण आणि 4 रौप्य) जिंकली असून गोव्यातर्फे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तो सर्वाधिक ‘पोडियम फिनिश’ मिळविणारा क्रीडापटू ठरला आहे. 24 वर्षीय बाबूने 2023 साली लेझर रन पुरुष वैयक्तिक प्रकारात सुवर्ण, तर मिश्र रिलेत रौप्यपदक जिंकले होते. यंदा शनिवारी त्याने उत्तराखंडमध्ये तीन रौप्यपदके पटकावली होती.

सूरज दत्ता वेळीपची चार पदके

मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये ट्रायथल प्रकारातील ॲथलीट सूरज दत्ता वेळीप याने आता एकूण चार पदके जिंकून बाबू गावकरनंतर दुसरा क्रमांक मिळवला आहे. सुरज याने 2023 मध्ये ट्रायथल प्रकारात दोन ब्राँझपदके जिंकली होती. रविवारी त्याला आणखी दोन ब्राँझपदके मिळाली. त्याने ट्रायथल मिश्र रिले व पुरुष सांघिक प्रकारात पदक प्राप्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT