Goa River Marathon 2024 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa River Marathon 2024: गोवा रिव्हर मॅरेथॉनमध्ये अंकित आणि चंद्रस्मिताची कमाल; पटकावले 'विजेतेपद'

Ankit Yadav & Chandrasmita Hazarika: अंकित याने 2 तास 49 मिनिटे 19 सेकंदात, तर चंद्रस्मिता हिने 3 तास 48 मिनिटे 04 सेकंदात शर्यत पूर्ण केली.

Manish Jadhav

पणजी: गोवा रिव्हर मॅरेथॉनमध्ये मुख्य 42 किलोमीटर शर्यतीत उत्तर प्रदेशमधील बलिया येथील अंकित यादव याने पुरुष गटात, तर कर्नाटकमधील बंगळूर येथील चंद्रस्मिता हजारिका हिने महिलांत विजेतेपद पटकावले. स्पर्धा रविवारी चिखली-वास्को येथे झाली.

अंकिताची कमाल!

अंकित याने 2 तास 49 मिनिटे 19 सेकंदात, तर चंद्रस्मिता हिने 3 तास 48 मिनिटे 04 सेकंदात शर्यत पूर्ण केली. स्पर्धेतील अन्य शर्यतीत 32 किलोमीटरमध्ये (20 मायलर) उडुपी-कर्नाटकचा सचिन पुजारी (2 तास 00 मिनिट 03 सेकंद), महिलांत उत्तर प्रदेशची सपना पटेल (2 तास 30 मिनिटे 12 सेकंद) विजेती ठरली. 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉनमध्ये दापोली-महाराष्ट्र येथील गतविजेता सिद्धेश बर्जे (1 तास 14 मिनिटे 49 सेकंद) याने विजेतेपद राखले. महिलांत कर्नाटकची (Karnataka) चंदना कलिता (1 तास 44 मिनिटे 43 सेकंद) अग्रेसर ठरली.

फरहीन चमकली

10 किलोमीटर शर्यतीत पुरुषांत कोल्हापूर-महाराष्ट्र येथील प्रधान किरुळकर (32.03 सेकंद), तर महिलांत बंगळूरची फरहीन फिरदोस (45.33 मिनिटे) अव्वल ठरली. शालेय संघांच्या पाच किलोमीटर शर्यतीत सडा-वास्को येथील लेफ्टनंट मयेकर शासकीय माध्यमिक विद्यालयाने मुलांत, तर कुठ्ठाळीच्या विद्या विहार हायस्कूलने मुलींत अव्वल स्थान प्राप्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND VS NZ: किवींचा धुव्वा उडवण्यासाठी 'रो-को' सज्ज! कधी आणि कुठे पाहता येईल पहिला एकदिवसीय सामना? जाणून घ्या

'कुशावती' जिल्ह्याचा उदय! जिल्हा मुख्यालयाचा मान मिळाल्याने केपेवासियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

विदेशी माणसांप्रमाणेच विदेशी झाडेही आक्रमक! आपली जैवविविधता वाचवण्यासाठी 'देशी' वृक्षांची गरज

VIDEO: अर्शदीप सिंगच्या रन-अपची विराटनं उडवली खिल्ली! रोहितलाही हसू आवरले नाही; सराव सत्रातील व्हिडीओ व्हायरल

Gauri Achari Murder Case: गौरी आचारी खून प्रकरण! गौरव बिद्रेचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला, विलंब होतो म्हणून जामीन मिळणार नाही

SCROLL FOR NEXT