Ranji Trophy Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

Goa vs Baroda Ranji Trophy 2026: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट अ गटात गोव्याचे प्रतिस्पर्धी बलाढ्य असल्याने आव्हान खडतर आहे, त्यास सामोरे जाण्यासाठी संघ पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट अ गटात गोव्याचे प्रतिस्पर्धी बलाढ्य असल्याने आव्हान खडतर आहे, त्यास सामोरे जाण्यासाठी संघ पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार आहे. मोहिमेतील पहिला सामना माजी विजेत्या बडोद्याविरुद्ध होईल.

गोवा आणि बडोदा यांच्यातील चार दिवसीय सामना रविवारपासून (ता. ११) कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर खेळला जाईल. उभय संघांत झटपट क्रिकेटमधील लढती यापूर्वी झालेल्या असल्या तरी रणजी करंडकात प्रथमच लढत होत आहे.

‘‘मोसमातील पहिला सामना घरच्या मैदानावर खेळत आहोत ही बाब समाधानाची बाब आहे. अनुकूल वातावरणात मोहिमेस सुरवात करणे हे कधीही चांगलेच. सुरवातीचे चारही प्रतिस्पर्धी ताकदवान आहेत. बलाढ्य संघांना सामोरे जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मोसमपूर्व तयारीत दर्जेदार प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळायला मिळाल्याने संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे,’’ असे गोव्याचे मुख्य प्रशिक्षक दिनेश मोंगिया यांनी सांगितले.

अवघा दुसरा रणजी करंडक मोसम खेळणारा डावखुरा अभिनव तेजराणा हा गोव्याचा नवा कर्णधार असला, तरी मोसमपूर्व लढतीत संघाचे नेतृत्व करताना त्याने परिपक्वता प्रदर्शित केली होती. यष्टिरक्षक शिवेंद्र भुजबळ संघातील नवा चेहरा आहे, बाकी सारे यापूर्वी रणजी करंडकात खेळलेले आहेत, त्यामुळे गोव्याच्या संघापाशी अनुभवाची कमतरता नाही. अतित शेठ याच्या नेतृत्वाखालील बडोद्याचा संघही अनुभवी असून दीपक हुडाच्या समावेशाने त्यांची ताकद वाढली आहे.

पणजी जिमखान्यावरील खेळपट्टी फलंदाजांना साथ देऊ शकते. भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर २७ प्रथम श्रेणी सामने झाले आहेत, त्यापैकी गोव्याचा संघ २५ रणजी करंडक सामने खेळला आहे. अखेरचा सामना ऑक्टोबर २०२४ मध्ये झाला होता, तेव्हा गोव्याने प्लेट गटात नागालँडला ८३ धावांनी पराभूत केले होते. त्या सामन्याच्या दुसऱ्या डावात फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहिले होते व गोव्याचा अनुभवी फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळने पाच गडी बाद केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Indian Super League: चेन्नईयीनचा विजय एफसी गोव्याने हिरावला; फातोर्ड्यात सामना 1-1 गोलबरोबरीत

Marathi Language: मराठीच्या नावाने गर्दी नको, गुणवत्तेची लाट हवी! भाषा टिकवण्यासाठी पाच धोरणात्मक बदलांची गरज

Wisdom of the Fourth Tree: तीन झाडांचा अहंकार मोडला, चौथं झाड मात्र आनंदात जगलं; आयुष्याचा मोठा धडा शिकवणारी गोष्ट!

Goa Politics: काँग्रेसच्या 'गोंय राखण' यात्रेचा भाजपच्या 'सेवा ज्योती'समोर निभाव लागणार?

SCROLL FOR NEXT