Goa Premier League Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Premier League: पर्वरीत दिवसभरात 20 गडी बाद, धेंपो क्लबची पणजी जिमखान्यावर 13 धावांनी आघाडी; सनथ, स्नेहलचं शानदार शतक

GCA Cricket Tournament: तीन दिवसीय सामन्यात बुधवारी पहिल्या दिवशी तब्बल २० गडी बाद झाले. त्यात धेंपो क्रिकेट क्लबने पणजी जिमखान्यावर पहिल्या डावात १३ धावांची आघाडी प्राप्त केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर तीन दिवसीय सामन्यात बुधवारी पहिल्या दिवशी तब्बल २० गडी बाद झाले. त्यात धेंपो क्रिकेट क्लबने पणजी जिमखान्यावर पहिल्या डावात १३ धावांची आघाडी प्राप्त केली.

धेंपो क्रिकेट क्लबचा पहिला डाव १६४ धावांत गुंडाळल्यानंतर पणजी जिमखान्याचा डाव १५१ धावांत संपुष्टात आला. पणजी जिमखान्याने अगोदरच स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असून त्यांना आव्हान देण्यासाठी धेंपो क्लबसाठी सामना महत्त्वाचा आहे.

मडगाव क्रिकेट क्लबच्या डॉ. राजेंद्र प्रसाद स्टेडियमवर पहिल्या दिवशी एमसीसी संघाचा डाव १७० धावांत आटोपल्यानंतर चौगुले क्लबने खेळ थांबला तेव्हा २ बाद ७५ धावा केल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक

धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव: ३७.२ षटकांत सर्वबाद १६४ (गौरेश कांबळी ४३, समर दुभाषी २२, निनाद राठवा ४६, तनय त्यागराजन ४-४९, राहुल मेहता ४-४५) व दुसरा डाव ः १ षटकात बिनबाद ० विरुद्ध पणजी जिमखाना, पहिला डाव ः ४६.१ षटकांत सर्वबाद १५१ (सुमीत घाडीगावकर २१, कश्यप बखले २१, तनय त्यागराजन ४३, सागर उदेशी २-५६, मोहित रेडकर ४-४३, निनाद राठवा ४-५०).

एमसीसी, पहिला डाव: ६४ षटकांत सर्वबाद १७० (शंतनू नेवगी ४०, ईशान गडेकर ५३, अभिनव तेज राणा २४, दर्शन मिसाळ ३-५७, महेश पिठिया २-६२, समर्थ राणे २-२०) विरुद्ध चौगुले स्पोर्टस क्लब, पहिला डाव ः २६ षटकांत २ बाद ७५ (आर्यन नार्वेकर ४३, रिजुल पाठक २३).

सनथ, स्नेहलची शानदार शतके

कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर सनथ नेवगी (१०९ धावा, ९० चेंडू, १६ चौकार, ५ षटकार) व कर्णधार स्नेहल कवठणकर (नाबाद १०१ धावा, १९१ चेंडू, १० चौकार) यांना शानदार शतके ठोकली.

त्यामुळे साळगावकर क्रिकेट क्लबने जीनो स्पोर्टस क्लबविरुद्ध पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावातील ८८ षटकांत ४ बाद ३७९ अशी सुस्थिती गाठली. याशिवाय आदित्य सूर्यवंशी (३६), कुवर पाठक (३९), नितीन तन्वर (६४) व यश कसवणकर (नाबाद २२) यांनीही उपयुक्त योगदान दिले. जीनो क्लबच्या सिद्धेश वीर याने ७८ धावांत ३ गडी बाद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT