International stadium Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी! गोव्याला मिळाले पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान; सूर्यकुमार यादवची विशेष उपस्थिती

Goa Cricket Stadium Inauguration: पहिल्यांदाच क्रिकेटसाठीच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खासगी मैदान गोमंतकीयांसाठी उपलब्ध झाले आहे

Akshata Chhatre

Goa international cricket stadium: गोव्यात केवळ फातोर्डा स्टेडियम होते जिथे फुटबॉल आणि क्रिकेटचे सामने खेळले जायचे. आता पहिल्यांदाच क्रिकेटसाठीच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खासगी मैदान गोमंतकीयांसाठी उपलब्ध झाले आहे. ‘१९१९ स्पोर्ट्‌स’ हे गोव्यात उभारलेले पहिले खासगी स्टेडियम असून त्यासाठी मी खास कमला प्रसाद यादव यांचे अभिनंदन करतो.

यादव यांनी ‘इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल बोर्ड’ कडून सर्व परवानग्या घेत या स्टेडियमची निर्मिती केली आहे. गोमंतकीय खेळाडूंसाठी हे स्टेडियम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने स्टेडियमसाठी राज्य सरकारकडून हवी ती मदत केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

वेर्णा औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या ''१९१९ स्पोर्ट्स’ या क्रिकेट स्टेडियमच्या उद्‌घाटन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा टी-२० चा कर्णधार सूर्य कुमार यादव, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर, दीपक नाईक, शमी साळकर, रणजीपटू स्वप्नील अस्नोडकर, शदाब जकाती, रोहन गावस देसाई व कमला प्रसाद यादव यांचे चिरंजीव वीर यादव व गोव्याची महिला क्रिकेटपटू हर्षिता यादव यांची उपस्थिती होती.

माविन गुदिन्हो म्हणाले, की भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करणारे कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी पाकिस्तानला तीन वेळा हरवून आशिया चषक मिळवला. या यशानंतर थेट गोव्यात येत त्यांनी गोमंतकातील क्रिकेट प्रेमींना प्रेरित केले आहेत.

कमलाप्रसाद यादव यांनी स्टेडियमची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांची आम्ही आभारी आहोत. यावेळी दामू नाईक व दाजी साळकर यांचीही भाषणे झाली. उपस्थितांचे सरपंच कमला प्रसाद यादव यांनी आभार मानले. सूर्याने गोव्यातही खेळण्यासाठी यावे.

प्रमोद सावंत म्हणाले, कालच आशिया चषक जिंकून आज गोव्यात दाखल झालेल्या सूर्य कुमार यादवचे मी संपूर्ण गोमंतकीयांतर्फे खास अभिनंदन करतो. सूर्य कुमारला याच स्टेडियमवर खेळताना पाहायला आम्हाला आवडणार आहे. त्यामुळे त्याने गोव्यात नक्की खेळावे. त्याचा चाहता वर्ग मोठा असल्याने त्याला पाहण्यासाठी हजारो क्रिकेटप्रेमी आज जमले आहेत. राज्यातील इतर खेळाडूंनाही अशा दिग्गज खेळाडूकडून नक्कीच प्रेरणा मिळेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गोव्यात खेळणार: सूर्यकुमार

येथील जनतेने मला भरपूर प्रेम दिले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोव्यातील या स्टेडियमवर खेळायला मला नक्की आवडेल, असे भारतीय टी २० क्रिकेट संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादवने आज सांगितले. मला गोव्याची मातृभाषा कोंकणी ही हृदयातून समजली आहे. मला दिलेल्या प्रेमाबद्दल मी खूप आभारी आहे.

स्टेडियमचे वैशिष्ट्य

‘१९१९ स्पोर्टस’ या स्टेडियमवर अत्याधुनिक अशा सुविधा आहेत. त्यामुळे हे स्टेडियम गोव्यातील ‘क्रिकेट’साठी एक महत्त्वाचे केंद्र बनेल. या मैदानाच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल.

७९ यार्ड जागेत या मैदानाचे बांधकाम करण्यात आले आहे. या मैदानावर एकूण नऊ खेळपट्ट्या आहेत तसेच दिवस-रात्रीचे सामने खेळविण्याची येथे व्यवस्था आहे. हे मैदान पाच हजार आसनक्षमतेचे असून ते वेर्णा औद्योगिक वसाहतीतील लोटली पंचायत क्षेत्रात साकारले गेले आहे.

‘सूर्या... सूर्या...’ ने गाजले स्टेडियम

भारताच्या टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचे गोव्यात दाबोळी विमानतळावर शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो यांनी स्वागत केले. राज्याचा पाहुणा म्हणून त्याला खास दर्जा देण्यात आला. यावेळी क्रिकेटप्रेमी, राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.

त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता सूर्याने मैदान गाठले. यावेळी उपस्थित शालेय विद्यार्थ्यांनी ‘सूर्या, सूर्या’ असा जयघोष करीत स्टेडियम दणाणून सोडले. पोलिसांच्या गराड्यात सूर्यकुमारने स्टेडियममध्ये प्रवेश केला. उल्लेखनीय म्हणजे, मैदानावरील एका ‘स्टँड’ ला सूर्यकुमार यादवचे नाव देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT