Arjun Tendulkar  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ranji Cricket Tournament: अर्जुन आणि दर्शन वाल्लोर रे तुमका! गोव्याने उडवला सिक्कीमचा धुव्वा; विजयाने संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान

Goa Defeated Sikkim: रणजी करंडक प्लेट विभागीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याने सलग दुसरा विजय नोंदवला. रांगपो येथे झालेल्या सामन्यात गोव्याने सिक्कीमचा एक डाव आणि 53 धावांनी धुव्वा उडवला.

Manish Jadhav

Goa Sport News: रणजी करंडक प्लेट विभागीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याने सलग दुसरा विजय नोंदवला. रांगपो येथे झालेल्या सामन्यात गोव्याने सिक्कीमचा एक डाव आणि 53 धावांनी धुव्वा उडवला. या विजयाने गोव्याने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. गोव्याकडून अर्जुन तेंडूलकर आणि कर्णधार दर्शन मिसाळ यांनी अफलातून गोलंदाजी केली. अर्जुन आणि दर्शनने प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. अर्जुनने 4 विकेट्सपैकी 3 क्लीन बोल्ड काढले.

सिक्कीमच्या फलंदाजांनी अर्जुन आणि दर्शनच्या भेदक माऱ्यापुढे गुडघे टेकले. सिक्कीमच्या एकाही फलंदाजाला साजेशी खेळी खेळता आली नाही. तुलनेत गोव्याच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी आपला जलवा दाखवू दिला. सामन्याच्या सुरुवातीपासून गोव्याने सिक्कीमला वरचढ ठरु दिले नाही. अर्जुन आणि दर्शनच्या भेदक माऱ्यापुढे सिक्कीमचा संघ पत्त्यासारखा कोसळला.

पहिला डाव

दरम्यान, आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर गोव्याने सिक्कीमला पहिल्या डावात 108 धावात गुंडाळले होते. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सुयश प्रभुदेसाई आणि रोहण कदम यांनी सिक्कीमच्या गोलंदाजांची पळताभुई थोडी केली. सुयश आणि रोहणने बिनबाद 90 धावांची सलामी दिली होती. पहिल्या दिवशी खेळ थांबला तेव्हा सुयश 50 धावांवर, तर रोहन 36 धावांवर खेळत होता. गोव्याचा संघ त्यावेळी अजून 18 धावांनी मागे होता. सुयशने 83 चेंडूंतील खेळीत सहा चौकार आणि एक षटकार मारला, तर रोहनने 67 चेंडूंचा सामना करताना पाच चौकार मारले.

अर्जुन, हेरंब आणि शुभमचा भेदक मारा

तत्पूर्वी, संघात पुनरागमन केलेल्या अर्जुन तेंडुलकरसह हेरंब परब आणि शुभम तारी यांनी सिक्कीमच्या फलंदाजी खिळखिळी केली. या त्रिकुटाने भेदक मारा करताना सिक्कीमची 4 बाद 35 अशी नाजूक स्थिती केली होती. पार्थ पालावत (39) आणि पालझोर तमांग (19) यांनी थोडाफार प्रतिकार केला. मात्र नंतर अंकुर मलिक याने फटकेबाजी करत 22 धावा केल्याने सिक्कीमला शतक ओलांडता आले, मात्र त्यानंतर अखेरच्या चार विकेट सिक्कीमने फक्त चार धावांत गमावल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT