Darshan Misal Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Premier League Auction: 'दर्शन' गोव्यातील महागडा क्रिकेटपटू! प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा लिलाव; 21 मार्चपासून रंगणार स्पर्धा

Darshan Misal: गोव्याचा माजी रणजी संघ कर्णधार, अनुभवी अष्टपैलू खेळाडू दर्शन मिसाळ राज्यातील क्रिकेटमध्ये सर्वाधिक महागडा क्रिकेटपटू ठरला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्याचा माजी रणजी संघ कर्णधार, अनुभवी अष्टपैलू खेळाडू दर्शन मिसाळ राज्यातील क्रिकेटमध्ये सर्वाधिक महागडा क्रिकेटपटू ठरला आहे. गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) आगामी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या लिलावात मंगळवारी या ३३ वर्षीय क्रिकेटपटूस सर्वाधिक ३२,५०० गुण मोजून चौगुले स्पोर्ट्‌स क्लबने आपल्या संघात घेतले.

गतमोसमातील जीसीए प्रीमियर लीग स्पर्धेत चौगुले क्लबने दर्शन याच्या नेतृत्वाखालीच विजेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यात त्यांनी पणजी जिमखान्यावर ९२ धावांनी मात केली होती. दर्शन रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील गोव्याचा दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी गोलंदाज आहे.

या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत १९७ गडी बाद केले असून तो मध्यफळीतील उपयुक्त फलंदाजही आहे. आणखी एक अष्टपैलू डावखुरा फिरकी गोलंदाज विकास सिंग यालाही लिलावात चांगला भाव मिळाला. जीनो स्पोर्ट्‌स क्लबने त्याच्यासाठी ३२,००० गुण मोजले. माजी आयपीएल खेळाडू, हुकमी फलंदाज सुयश प्रभुदेसाई याला तिसऱ्या क्रमांकाचा भाव मिळाला.

पणजी जिमखान्याने त्याला २८,५०० गुणांच्या मोबदल्यात संघात घेतले. यंदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत पदार्पणात सात सामन्यांत चार शतकांसह ७८८ धावा केलेल्या डावखुऱ्या अभिनव तेजराणा याला संघात घेताना धेंपो क्रिकेट क्लबने २२,५०० गुण मोजले, तर अष्टपैलू दीपराज गावकर १९,५०० गुणांच्या मोबदल्यात मडगाव क्रिकेट क्लबतर्फे खेळेल.

नवोदितांत आर्यन, शिवेंद्रला मागणी

गोव्याच्या सीनियर संघातून न खेळलेल्या एलिट-ब गटातील खेळाडूंत २३ वर्षांखालील संघाचा फलंदाज आर्यन नार्वेकर याला सर्वाधिक भाव मिळाला. १९,००० गुणांसह त्याला मडगाव क्रिकेट क्लबने संघात घेतले. यष्टिरक्षक-फलंदाज शिवेंद्र भुजबळ याला चौगुले स्पोर्ट्‌स क्लबने १८,५०० गुणांच्या मोबदल्यात संघात घेतले.

स्पर्धा २१ मार्चपासून

यावेळची जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा २१ मार्च ते १७ एप्रिल या कालावधीत खेळली जाईल. स्पर्धेत चौगुले स्पोर्ट्‌स क्लब, पणजी जिमखाना, जीनो स्पोर्ट्‌स क्लब, साळगावकर क्रिकेट क्लब, मडगाव क्रिकेट क्लब, धेंपो क्रिकेट क्लब या सहा संघांत जेतेपदासाठी चुरस असेल. स्पर्धेसाठी लिलाव मंगळवारी पर्वरी येथील जीसीए संकुलात झाला.

यावेळी जीसीए अध्यक्ष महेश देसाई, सचिव तुळशीदास शेट्ये यांची उपस्थिती होती. यंदा स्पर्धेत हरवळे-साखळी येथील नॅपेक्स मैदान नवे केंद्र असेल. याशिवाय पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदान, कोटार्ली-सांगेतील जीसीए मैदान, पणजी जिमखान्याचे भाऊसाहेब बांदोडकर मैदान, चिखली-वास्को येथील एसएजी मैदानावरही सामने होतील. साखळी फेरीतील अव्वल दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT