Goa Cricket Association Election Canva
गोंयचें खेळामळ

GCA: गोवा क्रिकेट संघटनेत पुन्हा 2 गट, निवडणूक होणार 16 सप्टेंबर रोजी; समितीतील मतभेद गाजण्याचे संकेत

Goa Cricket Association election: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) व्यवस्थापकीय समितीत पुन्हा एकदा उभी फूट पडली असून यावेळी फिरुन मनोमिलन झालेल्या गटासमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे.

Sameer Panditrao

Goa Cricket Association: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) व्यवस्थापकीय समितीत पुन्हा एकदा उभी फूट पडली असून यावेळी फिरुन मनोमिलन झालेल्या गटासमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे. संघटनेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समितीतील मतभेद गाजण्याचे संकेत आहेत.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जीसीए व्यवस्थापकीय समितीची निवडणूक १६ सप्टेंबर रोजी निश्चित झाली आहे. अगोदर व्यवस्थापकीय समितीने २४ ऑगस्ट रोजी निवडणूक जाहीर केली, तसेच निवडणूक अधिकारी नियुक्त करून निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती. आता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व प्रक्रिया पुन्हा सुरू होईल.

जीसीए व्यवस्थापकीय समितीत सध्या अध्यक्ष विपुल फडके (विनोद फडके गट) व सचिव शंभा नाईक देसाई (चेतन देसाई गट) एका बाजूला तर त्यांच्याविरोधात ‘जी ५’ गट उभा ठाकला आहे. यामध्ये संयुक्त सचिव रुपेश नाईक, खजिनदार दया पागी, सदस्य राजेश पाटणेकर, खेळाडू प्रतिनिधी गटातील आदित्य आंगले व डेझी डिसोझा यांचा समावेश आहे.

न्यायालयात रुपेश नाईक व इतर चौघांनी २४ ऑगस्ट रोजीच्या निवडणुकीस आव्हान दिले होते. जीसीए व्यवस्थापकीय समितीची शुक्रवारी बैठक नियोजित असून त्यावेळी ५ विरुद्ध २ असे चित्र जवळपास निश्चित आहे, असे जीसीएतील सूत्राने नमूद केले.

या वर्षी मार्चमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) संयुक्त सचिवपदी निवड झाल्यानंतर रोहन गावस देसाई यांनी जीसीए सचिवपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी उपाध्यक्ष असलेले शंभा नाईक देसाई यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी आली. जीसीए उपाध्यक्षपदी नवी नियुक्ती अजून झालेली नाही.

साहजिकच हे पद रिक्त आहे. आगामी निवडणुकीत तिसरी आघाडी बनून ‘जी-५’ गट संलग्न क्लबांना सामोरे जाऊ शकतो. या ‘जी-५’ गटाला गतनिवडणुकीत विरोधी असलेले चेतन देसाई गट व विनोद फडके गट एकत्र येणे रुचलेले नाही. त्यामुळेच व्यवस्थापकीय समितीत अगोदर बहुमत असलेल्या चेतन देसाई गटातच बंडाचा झेंडा फडकावला गेला आणि जी-५ गट अस्तित्वात आला, अशी माहिती या सूत्राने दिली.

स्टेडियमसाठी सरकारचे सहकार्य आवश्यक

सूत्राच्या माहितीनुसार, मागील तीन वर्षांत व्यवस्थापकीय समितीत नियोजित आंतरराष्ट्रीय स्टेडियम बांधणीसंदर्भात दुमत राहिले. अध्यक्ष विपुल फडके हे धारगळ येथे स्टेडियम होण्यासाठी इच्छुक होते. तसा निर्णय आमसभेतही झाला होता. दुसरा गट राज्य सरकार अनुकूल असलेल्या डिचोलीतील म्हावळिंगे येथे स्टेडियम व्हावे या मताचा होता. तेव्हा सचिव असलेले रोहन गावस देसाई हे सुद्धा म्हावळिंगे येथे स्टेडियमसाठी प्रयत्नशील होते.

आमसभेचा निर्णय आणि व्यवस्थापकीय समितीतील मतभेद यामुळे २०२२ पासून स्टेडियम बांधण्याबाबत काहीच हालचाल झाली नाही आणि त्यामुळे संलग्न क्लबांत प्रचंड नाराजी आहे. ‘‘गोव्यात क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी जीसीएला राज्य सरकारचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल.

नव्या व्यवस्थापकीय समितीला स्टेडियम उभारणीसाठी राज्य सरकारच्या कलाने कार्य करावे लागेल हे स्पष्ट आहे. विधानसभेतही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी क्रिकेट स्टेडियमसंदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे,’’ असे सूत्राने सांगितले. क्रिकेट स्टेडियमसाठी राज्य सरकारसोबत राहणाऱ्या व्यवस्थापकीय समितीतील गटाला बीसीसीआय संयुक्त सचिव रोहन गावस देसाई यांचा पाठिंबा मिळू शकतो अशी शक्यताही सूत्राने व्यक्त केली.

जीसीए निवडणूक १६ सप्टेंबर रोजी

गोवा क्रिकेट असोसिएशनची (जीसीए) नियोजित २४ ऑगस्ट रोजी होणारी निवडणूक आता पुढे ढकलण्यात आली असून, ही निवडणूक १६ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज दिले आहेत. याबाबत दोन्ही पक्षांच्या सहमतीने आदेश देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जीसीएच्या निवडणुकीसंदर्भात व्यवस्थापकीय समितीची शुक्रवारी (१ ऑगस्ट) संध्याकाळी ४ वाजता बैठक होणार आहे.

जीसीएच्या नियमावलीनुसार निवडणुकीसंदर्भातील परिपत्रक किमान ४५ दिवस आधी जारी करणे बंधनकारक आहे. मात्र, २५ जुलै रोजी परिपत्रक जाहीर करून २४ ऑगस्टला निवडणूक घेण्याची घोषणा करण्यात आली होती. यावरून निवडणूक प्रक्रियेस सुरुवात करताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा आक्षेप मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात उपस्थित करण्यात आला होता.

व्यवस्थापकीय समितीची आज बैठक

याचिकाकर्ते जीसीएचे विद्यमान संयुक्त सचिव रूपेश नाईक यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणुकीसंदर्भातील पुढील प्रक्रिया ठरवण्यासाठी आम्ही शुक्रवारी बैठक घेणार आहोत. या बैठकीत मतदार यादी, निवडणुकीचा कार्यक्रम आणि इतर संबंधित बाबींवर निर्णय घेतला जाईल. जीसीएच्या संविधानानुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार आणि सदस्य या सहा पदांकरिता निवडणूक घेण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT