Beach Volleyball Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

National Games 2025: बीच व्हॉलिबॉमध्ये गोव्याला ब्राँझपदक; रामा धावसकर व नितीन सावंत जोडीची कमाल

National Games 2025 Medal Tally: रामा याने यापूर्वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बीच व्हॉलिबॉलमध्ये दोन वेळा ब्राँझपदक जिंकले होते.

किशोर पेटकर

पणजी: रामा (पप्पू) धावसकर व नितीन सावंत या गोव्याच्या जोडीने उत्तराखंडमधील ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बीच व्हॉलिबॉमध्ये ब्राँझपदक जिंकले. स्पर्धेच्या इतिहासात रामा याचे हे तिसरे पदक ठरले.

बीच व्हॉलिबॉल स्पर्धा उत्तराखंडमधील तेहडी येथील शिवपुरी नदीच्या किनारी झाली. गुरुवारी सकाळी तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत गोव्याने तेलंगणाच्या जोडीवर अटीतटीच्या लढतीत २-१ फरकाने मात केली. गोव्याचे हे स्पर्धेतील अधिकृत तिसरे पदक ठरले.

गोव्याला स्क्वॉश व योगासनात सुवर्णपदक मिळाले आहे, अन्य एक सुवर्ण कलारीपयडू खेळात असून हा खेळ प्रदर्शनीय असल्याने त्याची अधिकृत पदकतक्त्यात नोंद नाही. रामा याने यापूर्वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बीच व्हॉलिबॉलमध्ये दोन वेळा ब्राँझपदक जिंकले होते.

२०१५ साली केरळमधील स्पर्धेत प्रल्हाद धावसकर, तर २०२२ मध्ये गुजरातमधील स्पर्धेत अॅरन परेरा त्याचा सहकारी होता. २०२३ मधील गोव्यातील स्पर्धेत बीच व्हॉलिबॉल खेळ ऐनवेळी बाहेर पडल्यामुळे गोव्यातील खेळाडूंची संधी हुकली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT