Sporting Clube de Goa|Sesa FA Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Charity Cup: पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पोर्टिंग क्लबने जिंकला ‘चॅरिटी कप’; सेझा अकादमीवर मात

Sporting Clube de Goa: म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर शनिवारी दोन्ही संघ निर्धारित वेळेत १-१ असे गोलबरोबरीत होते

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये सेझा फुटबॉल अकादमीवर ४-१ फरकाने मात करून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) चॅरिटी कप जिंकला. म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर शनिवारी दोन्ही संघ निर्धारित वेळेत १-१ असे गोलबरोबरीत होते.

निर्धारित वेळेत संकल्प काणकोणकर याने ३७व्या मिनिटास सेझा अकादमीचे गोलखाते उघडल्यानंतर सामन्यातील आठ मिनिटे बाकी असताना फ्रान्सिस फर्नांडिस याने ८२व्या मिनिटास केलेल्या केलेल्या गोलमुळे स्पोर्टिंग क्लब द गोवाने बरोबरी साधली.

पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पोर्टिंग क्लबच्या डॉयल अल्वेस, मायरन फर्नांडिस, सेल्विन मिरांडा, क्लुसनर परेरा यांचे फटके अचूक ठरले, तर सेझा अकादमीतर्फे फक्त क्लाईव्ह मिरांडा गोल करण्यात यशस्वी ठरला. श्लोक तिवारीचा फटका स्पोर्टिंगच्या गोलरक्षकाने अडविला, तर ओमकार शेटगावकरचा नेम चुकला. जीएफए अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT