GCA Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

GCA: 'जीसीए'च्या तुळशीदास शेट्ये, हरीश शिंदेंना अटकपूर्व जामीन! सरकारी ऑडिटरला डांबून ठेवल्याचा, दबाव आणल्याचा आरोप

Goa Cricket Association: पर्वरी पोलिसांत याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) कार्यालयाचे सरकारी ऑडिट करताना सीए श्री नायर यांना अडवून, दबाव आणून सही घेण्याचा प्रयत्न करणे, मारहाण-शिवीगाळ व धाक दाखवल्याप्रकरणी जीसीएचे सचिव तुळशीदास शेट्ये आणि अधिकारी हरीश शिंदे यांना मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. पर्वरी पोलिसांत याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता.

न्यायालयाने स्पष्ट केले की, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित कायदेशीर प्रमाणपत्र आधीच तपास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्याने या प्रकरणात संशयितांची कोठडीत चौकशी करण्याची गरज भासत नाही. नोंदणी खात्यातर्फे जीसीएच्या आर्थिक दप्तरांचे ऑडिट करण्यासाठी सनदी लेखापाल (सीए) श्री नायर यांची नियुक्ती करण्यात आली होती.

संशयितांतर्फे वकिलांनी सांगितले की, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तसेच भारतीय साक्ष अधिनियम २०२३च्या कलम ६३ अन्वये प्रमाणपत्र तपास अधिकाऱ्यांकडे जमा केले आहे. सीसीटीव्हीमध्ये तक्रारदार सुमारे ९० मिनिटांनी सुखरूप बाहेर पडताना दिसत आहेत.

२६ ऑगस्टला घडले होते ‘नाट्य’

गेल्‍या २६ ऑगस्ट रोजी पर्वरी येथील जीसीए कार्यालयात ऑडिट सुरू असताना तुळशीदास शेट्ये व हरीश शिंदे यांनी त्यांना जबरदस्तीने एका कागदपत्रावर सही करण्यास भाग पाडले, डांबून ठेवले तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार नायर यांनी ३१ ऑगस्ट रोजी पोलिसांत दाखल केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

SCROLL FOR NEXT