पणजी: चौगुले स्पोर्टस क्लबने ‘एमसीसी’विरुद्ध अनिर्णित लढतीत पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण प्राप्त करत गोवा क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. विजेतेपदासाठी त्यांची लढत पणजी जिमखान्याविरुद्ध होईल.
गोवा क्रिकेट असोसिएशन प्रथमच ‘मल्टि-डे’ (तीन दिवसीय) अंतिम लढत विद्युतझोतात आणि गुलाबी चेंडूसह पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर ३१ मार्चपासून खेळविणार आहे.
चौगुले क्लबने शुक्रवारी मडगाव क्रिकेट असोसिएशनच्या डॉ. राजेंद्र प्रसाद स्टेडियमवर तीन गुण प्राप्त केल्यामुळे त्यांचे १८ गुण झाले. पणजी जिमखाना १९ गुणांसह पहिल्या स्थानी राहिले, तर १६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावरील धेंपो क्लबला अंतिम फेरी हुकली.
कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर साळगावकर क्रिकेट क्लबविरुद्धच्या अनिर्णित लढतीत एक गुण मिळाल्यामुळे जीनो स्पोर्टस क्लबला तळाच्या क्रमांकावर राहावे लागले. स्पर्धेच्या नियमावलीनुसार, जीनो क्लबची स्पर्धेतून पदावनती असेल.
संक्षिप्त धावफलक ः साळगावकर क्रिकेट क्लब, पहिला डाव ः ९ बाद ५४७ घोषित व दुसरा डाव ः ४ बाद ९३ अनिर्णित वि. जीनो स्पोर्टस क्लब, पहिला डाव ः ६२.५ षटकांत सर्वबाद २११ (शुभम रोहिल्ला ९८, कौस्तुभ पिंगुळकर ३-७२, नितीन तन्वर ३-६४).
- एमसीसी, पहिला डाव ः सर्वबाद १७० व दुसरा डाव ः सर्वबाद २०३ अनिर्णित वि. चौगुले स्पोर्टस क्लब, पहिला डाव ः सर्वबाद २६६ व दुसरा डाव ः बिनबाद १४.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.