Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

GCA Cricket League: जीनो स्पोर्टसची आश्वासक सुरुवात! सैफ, दीपराज यांची शतके; 262 धावांची अभेद्य भागीदारी

GCA Premier League Cricket: स्पर्धेतील तीन दिवसीय सामन्यास रविवारी पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर सुरवात झाली.

Sameer Panditrao

पणजी: महंमद सैफ (१६४) व कर्णधार दीपराज गावकर (११४) यांनी नाबाद शतके नोंदविताना चौथ्या विकेटसाठी २६२ धावांची अभेद्य भागीदारी केली, त्यामुळे गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यात जीनो स्पोर्टस क्लबने पहिल्या दिवसअखेर वर्चस्व राखले.

स्पर्धेतील तीन दिवसीय सामन्यास रविवारी पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर सुरवात झाली. एमसीसी संघाविरुद्ध जीनो क्लबने पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ३ बाद ३१३ धावा केल्या होत्या. सैफ याने २४३ चेंडूंतील खेळीत १४ चौकार व पाच षटकार मारले. दीपराज याने २२७ चेंडूंचा सामना करताना आठ चौकार व एक षटकार लगावला. ३ बाद ५१ वरून त्यांनी संघाला भक्कम स्थिती गाठून दिली.

चौगुले क्लब सुस्थितीत

स्पर्धेत सांगे येथील जीसीए मैदानावर उशिरा सुरवात झालेल्या लढतीत धेंपो क्रिकेट क्लबविरुद्ध चौगुले स्पोर्टस क्लबने पहिल्या दिवसअखेर ६६ षटकांत २ बाद १८८ अशी दमदार स्थिती गाठली. दिवसअखेर क्षितिज पटेल ८२, तर मनन हिंग्राजिया ४० धावांवर खेळत होता. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची अभेद्य भागीदारी केली आहे. त्यापूर्वी आर्यन नार्वेकरने ३८, तर रिजुल पाठक याने २४ धावा. धेंपो क्लबसाठी दोन्ही गडी मनीष काकोडे याने बाद केले.

यश कसवणकरची झुंझार फलंदाजी

चिखली-वास्को येथील मैदानावर युवा गुणवान अष्टपैलू यश कसवणकर (नाबाद ८७) याच्या झुंझार फलंदाजीमुळे पणजी जिमखान्याविरुद्ध साळगावकर क्रिकेट क्लबला पहिल्या डावात दिवसअखेर ७ बाद २१५ असे सावरता आले. साळगावकर क्लबची अगोदर ४ बाद १७ व नंतर ५ बाद ४३ अशी घसरगुंडी उडाली. प्रतिकुल परिस्थितीत यश याने आदित्य सूर्यवंशी (४४) याच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली, नंतर विनय चौधरी (२४) याच्यासमवेत त्याने सातव्या विकेटसाठी ४६ धावांची भर टाकली. यश याने २६४ चेंडूंचा सामना करताना सहा चौकार व एक षटकार मारला. पणजी जिमखान्याच्या हेरंब परब (११-२-१६-४) याने भेदक मारा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: म्हापसा हादरलं! अपार्टमेंटजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ; मृत्यूचं कारण अद्याप गुलदस्त्यात

Rajpal Yadav: विमानतळाप्रमाणे जेलमध्येही हवा 'स्मोकिंग झोन', तिहार तुरुंगातून बाहेर येताच राजपाल यादवची अजब मागणी; काय म्हणाला नेमका?

Goa vs Kerala Women's Cricket: शतकी सलामीनंतरही गोवा पराभूत, सीनियर महिला एकदिवसीय स्पर्धेत केरळचा मोठा विजय

Poonam Pandey: पूनम पांडेच्या निशाण्यावर बडे क्रिकेटर्स? 'मेसेज' करून काय मागतात? स्वतःच केला खुलासा

Taliban New Penal Code: बायकोला हाडं तुटेपर्यंत मारणं आता 'कायदेशीर', तालिबानचा नवा क्रूर कायदा; अफगाणिस्तानात पुन्हा महिलांच्या हक्कांची पायमल्ली

SCROLL FOR NEXT